पुणे

जुनी सांगवी-बोपोडी पूल पावसाळ्यानंतरच सुरू होणार

CD

पुणे, ता. ६ : जुनी सांगवी ते बोपोडीला जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम पूर्ण होऊन हा पूल सुरू होण्यासाठी आता पावसाळा उजाडणार आहे. मागील अडीच वर्षांपासून पुलाचे काम सुरू असून, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर तरी हा पूल लोकांच्या सेवेसाठी सुरू होणार का? असा प्रश्‍न आता उपस्थित होऊ लागला आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांतील लोकसंख्या व प्रवाशांची संख्या वाढत असल्याने सध्या उपलब्ध असणाऱ्या पुलांवरही ताण येऊ लागला आहे. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जुन्या सांगवीतील ममतानगर, दत्त आश्रम ते बोपोडीतील औंध रस्त्याला (जयकर पथ) जोडणारा पूल २०२२ मध्ये उभारण्यास सुरुवात झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका संबंधित पुलाचे काम करत आहे. मार्च २०२३ पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वेळेत काम पूर्ण न झाल्याने कामाला मुदतवाढ घेण्यात आली होती.

ही कामे शिल्लक
डिसेंबर २०२३पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. आता पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, त्या भोवतीचे जोड रस्ते, पुलाची लोड टेस्टिंग यांसारखी कामे शिल्लक आहेत. सांगवीतील ममता नगर येथील १८ मीटर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप बाकी आहे. बोपोडीकडील बॉटनीकल गार्डनच्या बाजूला चौक विकसित करण्याचे काम व्हायचे आहे. त्यानंतर पुलाची लोड टेस्टिंग पूर्ण होईल. या सर्व कामांसाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर हा पूल सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.

असा सुटेल वाहतूक कोंडीचा प्रश्‍न
सध्या हिंजवडी, वाकड, पिंपळे गुरव, सांगवी येथून येणाऱ्या वाहनचालकांना पुणे स्टेशन, येरवडा, लष्कर परिसरात जाण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, औंध रस्ता, सांगवीमार्गे पुढे जावे लागते. हा पूल पूर्ण झाल्यास संबंधित वाहनचालकांना पडणारा मोठा वळसा वाचणार आहे.

पुलाचे काम पूर्ण झाले आहे. सांगवीकडील बाजूचे रस्ता रुंदीकरण व बोपोडीकडील बाजूचे चौकाचे काम होणे बाकी आहे. तसेच, पुलाच्या लोड टेस्टिंगचे काम व्हायचे आहे. या कामासाठी आणखी दोन ते तीन महिने लागतील. पावसाळ्यानंतर पूल खुला होऊ शकतो.
-प्रमोद ओंबासे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT