Ajit Pawar sakal
पुणे

कोरोनाच्या तिस-या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज; अजित पवार

दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे.

मिलिंद संगई, बारामती

दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे.

बारामती : कोरोनाची तिसरी लाट(corona third wave) येण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य शासनाने त्याला तोंड देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज बारामतीत दिली. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, दुसरी लाट कमी झाली तेव्हापासूनच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण आढावा घेत होतो. तिसरी लाट येईल असे गृहीत धरुन व्हेंटीलेटर, ऑक्सिजन व साधे असे तिन्ही बेडस वाढविण्यासह ऑक्सिजनचा पुरवठा तिप्पट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व आरोग्य विभागास दिले होते.

(The state government is ready to face the third wave of corona says deputy cm ajit pawar in baramti pune )

दुस-या लाटेत सर्वाधिक ऑक्सिजन जितका लागला त्याच्या तिप्पट व्यवस्था प्रत्येक ठिकाणी करण्यात आली आहे. आरोग्य विभाग सक्षम करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ग्रामीण रुग्णालय मंजूर केली, त्या साठी जवळपास चार हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दुसरीकडे नगरपालिका, महानगरपालिकांच्या रुग्णालयातही व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा नियोजन विकास निधीपैकी तीस टक्के निधी या कामांसाठी खर्च करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. चार कोटींच्या आमदारनिधीपैकी एक कोटी रुपये आरोग्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली होती. लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी आता प्रत्येक घरात जाऊन तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

पराभव मान्य...त्यांना शुभेच्छा....

सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकीत दुर्देवाने महाविकासआघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पराभव स्विकारत विजयाबद्दल प्रतिक्रीया दिली. अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणूकीत फरक पडला नाही या नारायण राणे यांच्या वकत्व्याबाबत बोलताना अजित पवार यांनी नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत, एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणावा आम्ही राज्याच्या माध्यमातून कोकणसाठी निधी उपलब्ध करुन देऊ, सर्वांनी मिळून कोकणचा कायापालट करु असे ते म्हणाले.

आरक्षणाशिवाय निवडणूका नकोच....

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपल्याशिवाय निवडणूका घेऊ नये या वर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे एकमत आहे, त्या मुळे या बाबत आम्हीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत आहोत, अलाहाबाद उच्च न्यायालयाने तेथील सरकारला निवडणूका पुढे ढकलण्याबाबत सुचविले आहे, कोरोना रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढते आहे, त्याचे गांभीर्य सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. जो पर्यंत प्रत्येक घटकाला त्याचा अधिकार मिळत नाही तो पर्यंत कोणतीही निवडणूक होऊ नये या साठी प्रसंगी न्यायालयात जाण्याचाही विचार करत असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

मतदानाचा हक्क बजावला...

दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीसाठी बारामतीती म.ए.सो. विद्यालयात अजित पवार यांनी आपला मतदानाचा हक्क आज सकाळी बजावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिका पराभूत झाली, पण शुभमन गिलकडून रोहित शर्माचं कौतुक; म्हणाला, 'जशी बॅटिंग केली...'

Bidkin Police : डोंगरू नाईक तांड्यावर तलवार, चाकू, कुऱ्हाडी, एअरगनसह एक जण अटक, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन; बिडकीन पोलिसांची कारवाई

INDW vs NZW: भारतीय महिला संघाने वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचला, न्यूझीलंडसमोर ठेवले 'इतक्या' धावांचे लक्ष्य

Sakharkherda News : दिवाळीच्या दिवशी काळीज पिळवटून टाकणारी घटना! खासगी पतसंस्थेच्या वसुलीला कंटाळून शिंदीच्या शेतकऱ्याने संपवले जीवन

Akola MIDC Theft : दोन महिने झाले तरी कीटकनाशकाचा शोध नाही! एमआयडीसी पोलिसांची निष्क्रियता उघड; वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

SCROLL FOR NEXT