pune
pune sakal
पुणे

सिंहगड रोडवर 'द बर्निंग कार' चा थरार

सकाळ वृत्तसेवा

सिंहगड रस्ता : कारच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने अचानक रस्त्यात कार पेटली मात्र सुदैवाने जीवित हानी टळली. याबाबत अधिक माहिती अशी की, एम एच 43 ए 110 होंडा सिटी कार हिंगण्याकडून धायरीच्या दिशेने निघाली होती. भा द खेर आनंदनगरच्या चौकात कार आली असता. सिग्नल ला चौकात गाडी थांबली होती त्यावेळी, अचानक कारच्या इंजिन मधून धूर येण्यास सुरुवात झाली. क्षणार्धातच कारने पेट घेतला. आजूबाजूच्या दुकानांनी उपलब्ध साहित्य तसेच पाणी टाकून कार विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशमन दलास कळविण्यात आले. आनंद नगर येथील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उपस्थित होऊन त्यांनी त्वरित आग विझवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी कटावणीच्या साह्याने बॉनेट उघडून आग विझवली. (Pune News)

नईम काझी यांची ती कार होती. ते स्वतः गाडी चालवत होते. सुदैवाने ते यातून बचावले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे सिंहगड रस्ता केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर फायरमन सतीश टाकवे, संजीव चव्हाण, राजेश वाझे, संदीप पवार आणि चालक क्षीरसागर यांनी कारला लागलेली आग विझवण्याची कामगिरी बजावली. या घटनेत कारचे नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: 'चाहत्यांसाठी आधी धोनी अन् मग CSK, जडेजाही वैतागतो', चेन्नईच्याच माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानचा सलग चौथा पराभव! कर्णधार सॅम करनच्या संयमी खेळीनं पंजाबला मिळवून दिला विजय

SCROLL FOR NEXT