Airline to Solapur sakal
पुणे

Airline to Solapur : सोलापूरला विमानसेवा सुरू करण्याचा साधा प्रस्तावही नाही

सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या १४ वर्षांपासून म्हणजे एका तपापासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र या कालावधीत विमानसेवा पुन्हा सुरु व्हावी असा साधा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

प्रसाद कानडे

पुणे : सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या १४ वर्षांपासून म्हणजे एका तपापासून प्रयत्न सुरु आहेत. मात्र या कालावधीत विमानसेवा पुन्हा सुरु व्हावी असा साधा प्रस्तावही पाठविण्यात आलेला नाही. सद्यःस्थितीत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर विमानतळाचे अन्य प्रश्न कायम असले तरीही मुळ प्रस्तावच नसणे धक्कादायक ठरले आहे.

सोलापूर-मुंबई विभागासाठी सुरु झालेली विमानसेवा ऑगस्ट २०१० मध्ये बंद पडली. त्यानंतर सोलापूरहून प्रवासी हवाई वाहतूक सुरु झालेली नाही. कधी चिमणीची अडचण तर कधी मोबाईल टॉवर अशा अडचणी मांडण्यात आल्या. विमानसेवा सुरू होण्यात तब्बल १०६ ठिकाणी अडथळे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यापैकी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली. त्यालाही जवळपास वर्ष झाले. ही चिमणी पाडण्यात आली तेव्हा येत्या सहा महिन्यात विमान सेवा सुरू करु अशी घोषणा करण्यात आली होती. पण लोकप्रतिनिधींना अद्याप हे आश्‍वासन पुर्ण करता आले नाही.

दुसरीकडे विमानतळावर सुमारे ८० कोटी रुपये खर्चाची कामे सुरु झाली. असे असले तरीही विमानसेवा पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव अद्याप पाठविण्यात आलेला नाही. परिणामी सोलापूरच्या विमानतळावर सेवेच्या अनिश्चिततेचे ढग कायम आहेत.

प्रस्तावाची जबाबदारी कोणाची ?

एखाद्या शहरातून विमानसेवा सुरू व्हावी असे वाटत असल्यास संबंधित राज्याने त्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला प्रस्ताव देणे गरजेचे असते. यासाठी स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असते. सोलापुरात दुर्दैवाने असे चित्र दिसत नाही. विमानतळाचा विकास करून हा प्रश्न सुटणार नसून त्यासाठी अन्य औपचारिकता पार पाडाव्या लागणार आहेत.

विमानसेवा सुरू करण्यापूर्वी

  •  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल होतो

  •  त्या सेक्टरमध्ये सेवा सुरू करण्यासाठी इच्छुक असलेल्या विमान कंपन्यांकडे मंत्रालय प्रस्ताव पाठवते

  •  इच्छुक कंपन्या विमानतळ तसेच प्रवासी संख्येचे सर्वेक्षण करतात

  •  सर्वेक्षणाचा अहवाल मंत्रालयाकडे सादर केला जातो

  •  या अहवालानुसार मंत्रालयाकडून सेवेबाबतचा निर्णय घेतला जातो

सोलापूरला विमानसेवा सुरू करण्यासाठीचा कोणताच प्रस्ताव केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील.

— मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT