पुणे

थेऊर फाट्यावरील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक

CD

थेऊर, ता.१२ : थेऊर फाट्यावरील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनला आहे. या मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहेत. पुलाला पडलेल्या भगदाडामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अष्टविनायक महामार्गावरील लोणीकंद ते थेऊर फाटा दरम्यानच्या या पुलाला सोलापूर रोडच्या बाजूला मोठा खड्डा पडला आहे. पुलाच्या बांधकामातील मुरूम आणि खडी भेगांमधून बाहेर आल्याने डांबरी थराखाली मोठी पोकळी तयार झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत पंडित यांनी पुणे शहर वाहतूक शाखेला पत्र लिहून ही वाहतूक तातडीने बंद करण्याची विनंती केली आहे.
हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे यांनी या समस्येकडे सर्वप्रथम लक्ष वेधले होते. ‘सकाळ’ने या वृत्ताला प्रसिद्धी दिल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतली. पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी अवजड वाहने वळवणे आवश्यक असल्याचे पंडित यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, या पुलाच्या कामाची चौकशी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी काकडे यांनी केली आहे.

01119

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT