Crime
Crime 
पुणे

स्मार्ट पद्धतीने रोकड पळविणाऱ्या दोघांना अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - कर्वे रस्त्यावर भरदिवसा एटीएममध्ये ‘स्मार्ट’ बदल करून रोकड पळविण्याच्या आरोपावरून दोन युवकांना डेक्कन पोलिसांनी जागेवरच मंगळवारी पकडले. त्यांच्याकडून २० कार्ड जप्त करण्यात आली आहेत. हरियानातून केवळ एटीएम फोडण्यासाठी ते शहरात आले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. 

याप्रकरणी संजय नलावडे (वय ४७, रा. बावधन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार देवकरण दीपचंद प्रजापती (वय २७) आणि सर्फराज उमर मोहंमद (वय २६, दोघेही रा. हरियाना) यांना घरफोडी आणि चोरीच्या आरोपावरून अटक झाली आहे. त्यांना न्यायालयाने ३० ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

कर्वे रस्त्यावर एरंडवण्याजवळील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाजवळ स्टेट बॅंकेचे एटीएम आहे. मंगळवारी (ता. २३) सकाळी ते एटीएममध्ये गेले. कार्ड स्वाइप केल्यावर पिन नंबर त्यांनी टाकला. त्यानंतर पैसे बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या वेळी दुसरा साथीदार मशिनचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी मागच्या खोलीत गेला. मात्र वीजपुरवठ्याची केबल दुसऱ्याच खोलीत होती. त्याने खोलीचा कडी-कोयंडा तोडला, ते तेथेच घुटमळत होते. त्यामुळे पंपावरील कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले गेले. त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानुसार त्यांना पकडले. त्यांच्याकडून ६० हजार रुपयांची रोकड हस्तगत केली. त्यांनी या पद्धतीने शहरातील एटीएममध्ये चोऱ्या केल्याचा संशय असून, त्याबाबत बॅंकांशी संपर्क साधण्यात आला आहे. दोन्ही चोरटे एका लॉजवर उतरले होते. ते मशिनचा वीजपुरवठा खंडित करीत. त्यामुळे रोकड बाहेर पडे परंतु, खातेधारकाला एसएमएस जात नसे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT