Thieves attack farmers cables of farm pump
Thieves attack farmers cables of farm pump 
पुणे

चोरट्यांचा आता शेतकऱ्यांच्या केबलवरच डल्ला!

नवनाथ भेके

निरगुडसर(पुणे) : शेतकऱ्यांच्या कांदयावर डल्ला तर. कधी डाळींबावर...बाजारभाव वाढला की चोरीला सुरुवात. आता तर चोरट्यांनी शेतकऱ्याच्या कृषीपंपाच्या केबलवरच डल्ला मारण्यास सुरवाच केले आहे. चोरटयांना नदीकिनारी केबलमधुन तांबे सहज मिळत असल्याने चोऱ्या वाढल्या आहेत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील चार शेतकऱ्यांची ८०० फुट केबलवर शुक्रवार (ता.२५) रोजी चोरटयांनी डल्ला मारला यातून चोरटयांना तांब्यातून ७ हजार मिळाले खरे पण २१ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निरगुडसर येथील नवीन दवाखान्याजवळ घोडनदीवर शेतकऱ्यांचे कृषीपंप आहे कृषीपंपासाठी शेतकऱ्यांनी केबलची जोडणी करुन कृषीपंप सुरु केले आहेत परंतु सध्या पाऊस पडत असल्याने पिकांना पाण्याची गरज नसल्याने पंप बंद आहेत, अशा परिस्थितीत शुक्रवारी मध्यराञीच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी येथील चार शेतकऱ्यांची प्रत्येकी २०० फुट अशी एकुण ८०० फुट केबल चोरली. वजन जास्त असल्याने घेऊन न जाता घटनास्थळीच राञीच्या सुमारास केबल सोलली आणि त्यातील तांब्याच्या तारा चोरट्यांनी लंपास केल्या यामुळे शेतकऱ्यांचे २० हजाराहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.  

रमाकांत थोरात, राहुल थोरात, रामदास गोपाळे व दत्ताञय टाव्हरे या चार शेतकऱ्यांची ८०० फुट केबल चोरीला गेली आहे. गेल्या चार वर्षात या शेतकऱ्यांची ही तिसऱ्यांदा चोरी असल्याने या शेतकऱ्यांना जवळपास दरवर्षी नुकसान सोसावे लागत आहे. ८०० फुट केबलमध्ये जवळपास १५ ते २० किलो तांबे निघते या तांब्याला किलोला ४०० रुपयांहून अधिक बाजरभाव आहे अशा तांबे असलेल्या केबल चोरुन नेल्या.त्यामुळे चोरटयांना तांब्यातून ७ ते ८ रुपये हजार मिळाले परंतु शेतकऱ्यांना भुर्दंड २० ते २१ हजार रुपये पडला आहे.तरी पोलिसांनी तातडीने तपास करुन चोरटयांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.

चुकांची ‘उत्सवी’ पुनरावृत्ती ठरेल घातक..

हजारो फुट केबलची चोरी......!
आंबेगाव तालुक्यातील घोडनदीमुळे १० ते १२ हजार हेक्टर क्षेञ बागायत झाले आहे,त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी नदीवर कृषीपंप बसवले असुन आपल्या शेतावर पाणी पोहचवले आहे यासाठी कृषीपंपाना केबलची जोडणी केली आहे. चोरटयांना राञीच्या वेळी केबलमधुन तांबे हमखास उपलब्ध होत आहे यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांची हजारो फुट केबल चोरटयांनी लंपास केली आहे. त्यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

न्यू नॉर्मल’ला हवी संयम, शिस्तीची जोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT