bhagatsing koshyari sakal
पुणे

राज्यपालांची शाबासकी हाच आशीर्वाद, सरपंच मोनिका रंगनाथ पढेर

घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका रंगनाथ पढेर यांची भावना

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : राज्यपाल सिंहगडावर आल्यावर भेट घेऊन त्यांना गावाच्या विकासासाठी निवेदन देण्याची संधी मिळाली. त्यांनी आस्थेने चौकशी करून माझ्या पाठीवर शाबासकीचा हात ठेवला, हाच माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आनंदाचा क्षण आहे, अशी भावना घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका रंगनाथ पढेर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

आपली राज्यपालांशी भेट होईल का, हे माहिती नव्हते. आमदार भीमराव तापकीर यांनी मला पुढे बोलवून घेतले. घेरा सिंहगडची सरपंच म्हणून राज्यपालांना निवेदन देण्याची संधी मिळाली. अर्ध्या-पाऊण मिनिटाच्या वेळेत त्यांनी मला, ‘सरपंच आहेस का, किती शिक्षण झाले,’ असे विचारले. ‘होय, सरपंच आहे’, मी बी.कॉम. शिक्षण घेतल्याचे सांगितल्यावर त्यांनी माझे कौतुक केले.

पाठीवर शाबासकीचा आणि कौतुकाचा हात ठेवून गावासाठी चांगले काम करण्याचा आशीर्वाद दिला, असे पढेर यांनी सांगितले. सरपंच पढेर म्हणाल्या, ग्रामपंचायत घेरा सिंहगड आदिवासी क्षेत्र म्हणून घोषित करावे. स्मशानभूमी, विजेचे ट्रान्सफॉर्मर, विविध वस्त्यांवर वीजपुरवठा करणे, गाव मंदिराकडे जाणारे रस्ते करणे, पांदण रस्ते करणे, पाणीपुरवठा योजना राबवणे, गाव व वनविभागाच्या जागेची मोजणी करून मिळणे, अशा विविध मागण्या त्यांनी यानिमित्ताने राज्यपालांकडे केल्या.

सिंहगडावरील ऐतिहासिक घटना, त्यांचे संदर्भ, नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती राजाराम महाराज यांची माहिती अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांनी दिली. सिंहगड व परिसरातील वन्यजीव, स्थानिक जैवविविधता तसेच वन संवर्धनाची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली. उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, विवेक पाटील, प्रशांत शिर्के, फुलचंद फड उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Police Service: खाकीतील माणुसकीचा अनोखा चेहरा! 112 वर कॉल करा, पोलिस पोहोचवतील औषधे आणि जीवनावश्यक वस्तू

Video : निष्ठा असावी तर अशी! मालकाचा जीव वाचवण्यासाठी कुत्र्याने शेवटच्या श्वासापर्यंत कोब्राशी दिली झुंज; व्हिडिओ पाहून नेटकरीही हळहळले

RBI on Inflation: दिवाळीत महागाईचा फटका बसणार? RBI गव्हर्नरांचा मोठा इशारा; कारण काय?

Latest Marathi News Live Update : विरोधकांनी रांचीमध्ये JPSC पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांशी चर्चा केली का? भाजप खासदार जगदंबिका पाल यांचा सवाल

NCP Politics: मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

SCROLL FOR NEXT