Pune esakal
पुणे

Pune News : अतिक्रमण कारवाई नंतर ही पुन्हा परिस्थिती जैसे थे

एमजी रोड वरील प्रकार

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट - पूर्व भागातील शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जाणारा एम जी रोड, कॅम्प भागात अतिक्रमण धारकांनी विळखा घातला आहे. हप्ते द्या आणि कुठेही व्यवसाय करा. असा उपक्रम बोर्डातील काही मन मर्जीतल्या अधिकाऱ्यांनी राबविला आहे. त्यामुळे अतिक्रमण धारकांना कायद्याच्या धाक असण्याऐवजी याउलट अभय देण्याचे काम या अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.

डेप्युटी सीईओ नितीश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार पुणे कँटोन्मेंट बोर्ड परिसरात अतिक्रमण कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी कारवाई सुरू असताना कार्यकर्ते व स्थानिकांनी बोर्डाकडे धावाधाव घेतली होती.

कारवाई करताना अधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप प्रदीप खोले यांनी केला.

यावेळी मुख्य रस्ते वगळता कँटोन्मेंट परिसरातील कोळसा गल्ली, सेफी लाईन, जय जवान मंडळ, राणी लक्ष्मीबाई उद्यान अशा काही अंतर्गत भागातील गल्ली बोळात जुजबी कारवाई करण्याचा देखावा अधिकाऱ्यांनी केला. मात्र मुख्य रस्त्यावरील एम जी रोड, पुलगेट व एम्प्रेस गार्डन, येथील सोलापूर रोडवर अतिक्रमणाचा विळखा कायम आहे.

राईट वॉक इन फूटपाथ असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना ही एम जी रोड वरील संपूर्ण फूटपाथ बेकायदा विक्रेत्यांनी व्यापले आहे. नागरिकांना पायी चालण्याकरिता एकही फुटपाथ मोकळा नाही. त्याच बरोबर अनेक विक्रेते रस्त्यावर आल्याने व त्यात अस्तावत वाहनांच्या पार्किंगची भर पडत आहे. त्यामुळे या ठिकाणी कायम वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सोलापूर रोड वर नव्याने शेकडो व्यवसाय करणारे अतिक्रणधारक निर्माण झाले आहे. संरक्षण खात्याच्या कार्यालय परिसरात हा व्यवसाय जोमात सुरू असल्याने याला कोणामार्फत शह दिला जात आहे. असा सवाल स्थानिक रहिवासी अतुल गोंदकर यांनी केला आहे.

यावेळी गोंदकर म्हणाले की, कारवाई प्रसंगी मालाची तोडफोड मोठ्या प्रमाणात केली गेली. स्थानिक व बेरोजगार असलेले युवक याठिकाणी नोकरी येथे नसल्याने व्यवसाय करतात. सर्वाचे हातावराचे पोट आहे. कॅन्टोन्मेंट परिसरात मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक आहेत. त्यांची चौकशी होत नाही व त्याच्यावर कधीच कारवाई होत नाही. त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने त्यांचे समर्थन केले जात आहे.

कारवाई होण्या आधीच विक्रेते गायब कारवाई होणार असल्याची माहिती आधीच पुरवली जात असल्याने अनेक विक्रेते आधीच गायब होतात. कारवाई संपली की, पुन्हा हातगाड्या व स्टॉल थाटले जातात. कॉल रेकॉर्ड व लोकेशन तपास यंत्रणा सुरू करावी कारवाईची नोटीस बजावताच संबधित अधिकारी व कर्मचारी आधीच फोन वर विक्रेत्यांना फोन वरून व प्रत्यक्ष भेटून कारवाई होणार असल्याची माहिती पुरवत असतात.

त्यामुळे संबंधितांचे कॉल रेकॉर्ड व लोकेशन तपासण्याकरिता यंत्रणा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे. स्टॉल धारकांना माजी सदस्यांचा आशीर्वाद बाबाजन चौक, फॅशन स्ट्रीट, शिवाजी मार्केट परिसर, बुटी स्ट्रीट, सेंट्रल स्ट्रीट, ताबूत स्ट्रीट, कोहिनूर चौक अरोरा टॉवर चौक, गुरुद्वारा रोड अशा आदी कँटोन्मेंट परिसरात माहिती घेतली असता, यापैकी अनेक स्टॉल व हातगाड्या हे कँटोन्मेंटचे माजी सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांचे असल्याची माहिती निर्दशनास आली.

यासंबंधी बोर्डातील अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, पत्रकारांना बोर्डाच्या कुठल्याही विषयी माहिती देण्यात सीईओ सुब्रत पाल यांनी मनाई केली आहे. त्यामुळे यासंदर्भात आम्ही काहीही उत्तर देऊ शकत नाही. तसेच यासंदर्भात बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT