पुणे

‘छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांना तिलांजली’ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘छत्रपती शाहू महाराजांनी कर्मकांडाला आयुष्यभर विरोध केला. परंतु त्यांच्या नावाने असलेल्या ‘सारथी’ संस्थेच्या संचालक मंडळाने मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करून कर्मकांड केले आहे,’’ असा आरोप करीत त्याचा मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. तसेच, ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मराठा समाजातील मुला-मुलींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) स्थापन करण्यात आली. सेनापती बापट रस्त्यालगत या संस्थेच्या मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. ‘सारथी’ संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १६) भूमिपूजनासाठी धार्मिक पूजा करण्यात आली. या कृत्याचा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कुंजीर, सचिन आडेकर, अनिल ताडगे, जितेंद्र कोंढरे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठा समाजासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. हे काम सुरू करताना कोणतेही सोपस्कार पार पाडण्यात वेळ घालू नये, असे सांगितले असतानाही भूमिपूजन करण्यात आले, असे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कर्मचारी सरकारी कार्यालयांमध्ये कर्मकांड करू शकत नाहीत, असा कायदा असतानाही ‘सारथी’च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी केलेल्या कृत्याचा निषेध करतो. या दोघांवर कारवाई करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करणार असून, अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत गुन्हा दाखल करणार आहोत.

- राजेंद्र कुंजीर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

छत्रपती शाहू महाराजांनी आयुष्यभर ज्या कर्मकांडाला विरोध केला तेच कर्मकांड छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या ‘सारथी’ संस्थेमध्ये करण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांच्याच विचारांना तिलांजली देण्याचे काम ‘सारथी’च्या संचालकांनी केले आहे.

- सचिन आडेकर, समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT