Dead Body Sakal
पुणे

पुण्यात वेगवेगळ्या भागात कालव्यात मंगळवारी आढळले तीन मृतदेह

पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागातुन वाहणाऱ्या मुठा डावा कालव्यात मंगळवारी तीन मृतदेह आढळून खळबळ उडाली.

प्रशांत पाटील

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागातुन वाहणाऱ्या मुठा डावा कालव्यात (Mutha Left Canal) मंगळवारी तीन मृतदेह (Deathbody) आढळून खळबळ उडाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी तीनही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले असून त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. (Three Bodies were Found in a Canal in Different Parts of Pune on Tuesday)

याप्रकरणी हडपसर, दत्तवाडी व सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. हडपसर येथे शिंदे वस्ती परिसरात असलेल्या कालव्यात एक मृतदेह तंरगत असल्याची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर जवानांनी मृतदेह बाहेर काढला आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत व्यक्तिचे वय 35 ते 40 असून हडपसर पोलिसांकडून ओळख पटविण्यात येत आहे.

 जनता वसाहतीमधील कालव्यामध्ये देखील एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी ही माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील मृतदेह बाहेर काढला आहे. त्याची ओळख पटलेली नाही. तीन ते चार दिवसांपूर्वीचा हा मृतदेह असण्याची शक्यता आहे. दत्तवाडी पोलीस ओळख पटविण्याचे काम करत आहेत.

दरम्यान, सिंहगड रोड भागातील वडगाव येथील कालव्यात ही एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. त्याचीही ओळख पटली नसून त्याबाबत सिंहगड रोड पोलिस तपास करत आहेत. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर अग्निशमन दल व पोलिसांनी धाव घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT