पुणे

वेश्‍याव्यवसायातून तीन मुलींची सुटका 

सकाळवृत्तसेवा

पुणे : हडपसर परिसरातील एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींसह एका तरुणीची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

दलाल शबाना दखनी (वय 30, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) व लॉजचा व्यवस्थापक यासीन इब्राहिम साहेब (वय 36, मूळ रा. उडपी, कर्नाटक) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

हडपसर भागातील हांडेवाडी येथील सौरभ संगम लॉजमध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती रेस्क्‍यू फाउंडेशनने सामाजिक सुरक्षा विभागाला दिली होती. त्यानंतर विभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी या लॉजवर छापा घातला. त्या वेळी तेथे दोन अल्पवयीन मुली व एक तरुणी आढळून आली. पथकाने त्यांची सुटका केली. अल्पवयीन मुलींना शबाना ही वेश्‍याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले. 

सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, पोलिस निरीक्षक सुनील तांबे, सहायक निरीक्षक अनिता खेडकर, उपनिरीक्षक योगिता कुदळे, नामदेव शेलार, राजाराम घोगरे, प्रमोद म्हेत्रे, नितीन लोंढे, कविता नलावडे, गीतांजली जाधव, सुप्रिया शेवाळे, अनुराधा ठोंबरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT