Three killed in road accident Including nine month old baby six injured one in critical condition pune
Three killed in road accident Including nine month old baby six injured one in critical condition pune Sakal
पुणे

लवळे फाटा येथील अपघातात तीन जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट : पुणे कोलाड महामार्गावरील लवळे फाटा (ता.मुळशी) येथील आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन महिला व नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. येथील लवळे फाट्यावर फरशीने भरलेला ट्रक पौडच्या दिशेने जात होता. त्याच्या पुढे दोन दुचाकी व एक चारचाकी अशी तीन वाहने प्रवाशांसह जात होती. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने समोरील तन वाहनांना ट्रकने जोरदार ठोकर दिली. त्यावेळी पुढील बाजूस सीबीझेड या दुचाकीवर बाळासह चाललेले दांपत्यांना जोरदार ठोकरल्याने बाळ व आईचा जागीच मृत्यू झाला आहे.

अन्य दुसऱ्या दुचाकीवरील एका महिलेला उपचारासाठी हॅास्पीटलमध्ये दाखल करताना मृत्यू झाला आहे. रेश्मी पवन पटेल (वय ३० ) व रिहान पवन पटेल ( वय ९ महिने) यांचा जागीच मृत्यू झाला असून दवाखान्यातील मृत्यू झालेल्या महिलेचे नाव समजू शकलेले नाही. पोलिस घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून वाहतूक पोलिस राजेश गायकवाड व त्यांचे सहकारी जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT