Three MLA of Shinde group and bjp connected to Amol Mitkari politics sakal
पुणे

Amol Mitkari : शिंदे गटाचे तीन आमदार संपर्कात; अमोल मिटकरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे

प्रफुल्ल भंडारी

दौंड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटातील तीन आमदार व भारतीय जनता पक्षाचे काही आमदार आमच्या पक्षाच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. दौंड शहरात पत्रकारांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी हा दावा केला आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांच्या आमदारांवर विश्वास असता तर नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी विस्तार केला असता. विस्ताराच्या दिवशी सरकार कोसळेल. आमच्या म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात असलेले शिंदे गटातील तीन आमदार हे विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मधील आहेत. भाजपचे काही आमदार संपर्कात आहेत पण आकडा आता सांगणार नाही.

त्यांना एवढी तरी अक्कल असावी ....

उच्च शिक्षण खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक किंवा ती प्रतिक्रिया लोकशाहीला धरून नाही. एकदा बोलता व नंतर माफी मागता, याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक बोलता. तुम्हा एवढी तरी अक्कल असावी की आपण कॅबिनेट मंत्री आहोत. महापुरूषांविषयी असे कसे बोलू शकतात ?. पण या प्रकरणात भीमसैनिक खवळला तर शांत राहणार नाही, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना भविष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागण्याची भीती अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT