पुणे

WDJ2405.txt

CD

मुलीची छेड काढणाऱ्यास शिक्षा

वडूज, ता. २४ : अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. एस. कोले यांनी सुनावली. प्रसाद श्रीकांत सडके (वय २२, रा. उंचीठाणे, ता. खटाव) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत औंध पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित फिर्यादी ही अल्पवयीन आहे, हे माहीत असताना सुद्धा आरोपी सडके याने तिची छेड काढली. त्यावेळी सडके याने फिर्यादीस तू जर ही गोष्ट कोणाला सांगितली, तर मी तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देऊन मानेवर चापट मारून पळून गेला.
याबाबत दोन ऑगस्ट २०२२ रोजी औंध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षक जी. बी. केंद्रे यांनी साक्षीदारांचे जाब-जबाब नोंदवत व कसून तपास करून आरोपीविरुद्ध येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात याकामी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील रघुनाथ खोत यांनी काम पाहिले. जिल्हा सरकारी वकील आर. डी. खोत यांचा युक्तिवाद व साक्षीदारांचे जाब-जबाब, कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कोले यांनी आरोपी सडके याला तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, तसेच तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, एक वर्ष सक्तमजुरी व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास दोन आठवडे साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
खटला चालवण्याकामी पोलिस उपअधीक्षक रणजित सावंत आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी मार्गदर्शन केले, तसेच प्रॉसिक्युशन स्क्वाडचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव, पोलिस हवालदार सी. एस. सानप, विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, अमीर शिकलगार यांनी सहकार्य केले.
------------------
29731

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT