Thrilling tractors on road at upper last bus stand 
पुणे

अप्पर शेवटचा बसथांब येथे रस्त्यावर ट्रॅक्टरचा थरार

दहा दुचाकी, एका टपरीचे नुकसान, एका महिला व नागरिक जखमी

नितीन बिबवे

बिबवेवाडी - अप्पर शेवटच्या बस थांब्या समोर शनिवारी दुपारच्या वेळी रिकामा ट्रॅक्टर ट्रॉलीसह उताराच्या रस्त्याने सुसाट वेगाने नागरिकांमध्ये घुसला. त्यामध्ये दहा दुचाकी व एका टपरीचे नुकसान करत स्नेहलता सुर्यवंशी यांच्यासह दोन नागरिक जखमी झाले.

अप्पर शेवटचा बस थांब्याचा रस्ता तीव्र उताराचा असून स्थानिक नागरिक आनंद साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास ट्रॅक्टर चालक उताराच्या रस्त्यावर ट्रॅकटर लावून नाश्ता करण्यासाठी गेला होता, ट्रॅकटर उताराच्या रस्त्यावर निसटून विना ड्रायव्हर वेगात रस्त्यावर धावत होता, कोणालाही काही कल्पना नव्हती सुदैवाने ट्रॅकटर रस्त्यावर डाव्या बाजूला दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी घुसून दहा दुचाकींना धडक देत थांबला. यामध्ये दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एका महिलेसह दोन नागरिक जखमी झाले.

तीन वर्षापूर्वी एक चारचाकी वाहन अशाच प्रकारे उताराच्या रस्त्यावर लावले होते तेही अशाच प्रकारे उताराच्या रस्त्यावर निसटून चार नागरिक जखमी झाले होते. उताराच्या रस्त्यावर तीन वर्षांपूर्वी दोन वेळा पीएमपीएल च्या बस चे ब्रेक निकामी होऊन झालेल्या अपघातात एका नागरिकाला प्राण गमवावे लागले होते तर अनेकजण जखमी झालेल्याची घटना घडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT