Pune-Railway 
पुणे

#PuneRailway रेल्वे स्थानकापासून आता पाच किलोमीटरपर्यंत मिळणार मोबाईलवर तिकीट

सकाळ वृत्तसेवा

पुणे - रेल्वेच्या तिकिटासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावरूनही तुम्हाला हव्या त्या गाडीचे किंवा लोकलचे अनारक्षित तिकीट मोबाईलवर ‘यूटीएस’ (अनरिझर्व्हड तिकिटिंग सिस्टीम) या ‘ॲप’द्वारे मिळणार आहे. त्याची प्रिंटआउटही काढण्याची गरज नसेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या सेवेला प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे.

‘यूटीएस ॲप’द्वारे मोबाईलवरून रेल्वे गाडीचे तिकीट देण्याची यंत्रणा प्रशासनाने ४ एप्रिल २०१८ रोजी पुण्यात सुरू केली. सुरुवातीला या ‘ॲप’मधून फक्त लोकलचे तिकीट मिळत होते. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच म्हणजे ऑक्‍टोबरपासून रेल्वेच्या सर्व गाड्यांचे तिकीट या ‘ॲप’मधून प्रवाशांना मिळणे शक्‍य झाले. सुरुवातीला प्रवाशांना रेल्वे स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावरून तिकीट मिळत असे. आता ही सुविधा पाच किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे घरापासून निघालेल्या प्रवाशाला रेल्वे स्थानकापर्यंत पोचण्यापूर्वीच हातात तिकीट मिळू शकते. एखाद्या प्रवाशाकडे रेल्वेचे आरक्षण नसल्यास या ‘ॲप’द्वारे तिकीट काढून तो प्रवास करू शकतो. तसेच, आरक्षण आणि तिकिटामधील फरकाची रक्कम तिकीट तपासनिसाकडे जमा करून तो आरक्षणही मिळवू शकतो, अशी माहिती रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर 
यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : एमपीएससी सचिवांना काळं फासल्याप्रकरणी गृहराज्यमंत्र्यांचा कारवाईचा इशारा

SCROLL FOR NEXT