Madhav-Anil-and-Uttam
Madhav-Anil-and-Uttam 
पुणे

गाडगीळ, अवचट, पाचर्णेंना टिमविची डी.लिट.

सकाळवृत्तसेवा

पुणे - ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट आणि ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचर्णे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी. लिट. पदवी देण्यात येणार आहे. या संदर्भातील घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांनी सोमवारी केली. पदवीप्रदान कार्यक्रम शनिवारी (ता. १६) सकाळी पावणेदहा वाजता होईल. 

गाडगीळ यांनी पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. पश्‍चिम घाटातील जैवविविधतेबाबत त्यांनी तयार केलेला अहवाल हा महत्त्वपूर्ण ठरला आहे. देशातील जैवविविधतेतील शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली नोंदणी हे डॉ. गाडगीळ यांचे बहुमोल योगदान ठरले आहे. डॉ. अवचट यांनी आपल्या लेखनातून उपेक्षित घटकांचे प्रश्‍न मांडले आहेत. ‘माणसं’, ‘वाघ्या-मुरळी’, ‘कोंडमारा’ ही त्यांची पुस्तके समाजाचे वास्तव चित्र लोकांसमोर मांडतात.

व्यसनमुक्तीसाठी मुक्तांगण केंद्राच्या माध्यमातून त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. त्याचबरोबर चित्रकार आणि शिल्पकार असलेले उत्तम पाचर्णे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार, राष्ट्रीय ललित कला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांनी कलाक्षेत्रात योगदान दिले आहे. या तिघांना आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल डी. लिट पदवीने  गौरविण्यात येणार आहे; तसेच या प्रसंगी ७६ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी; तर १२ विद्यार्थ्यांना एम. फिल. पदवी दिली जाणार आहे. कौशल्य विकास शाखेच्या २२६ विद्यार्थ्यांना, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ४५६६ विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT