टाकवे बुद्रुक : गॅसदरवाढीमुळे नोकरी करूनही मिळेल ते सरपण चुलीसाठी घेऊन जाताना महिला. 
पुणे

रॉकेल महागल्याने सरपण जमविण्याची नागरिकांवर वेळ

सकाळवृत्तसेवा

टाकवे बुद्रुक - गॅसदरवाढीमुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांना सिलिंडर भरणे अशक्‍य झाल्याने तसेच बाजारात विकत मिळणारे रॉकेल व वखारीतील लाकडे महाग झाल्याने नाइलाज म्हणून महिलांची पावले डोंगरांच्या दिशेने वळू लागली असून, त्यांना सरपण जमा करावे लागत आहे.

शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबांना सिलिंडर दोन वर्षे मोफत भरून दिले. मात्र आता ही मोफत सेवा शासनाने बंद केली आहे. पूर्वी ग्रामीण भागात रेशनमध्येही प्रत्येक कुटुंबाला तीन ते चार लिटर रॉकेल मिळत होते. त्यामुळे घरोघरी रॉकेलवरील स्टोव्हचा वापर केला जायचा. आता शासनाने रॉकेल पुरवठा करणेही बंद केल्याने परिणामी स्टोव्ह वापरणेही बंद करावे लागले आहे. पर्यायी, ग्रामीण भागात स्वयंपाक बनवण्यासाठी सकाळ- सायंकाळ चुली पेटू लागल्या आहेत. त्यामुळे गावागावांत पुन्हा धुराचे लोट दिसू लागले आहेत. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात धुरामुळे नाहीतर गॅसदरवाढीमुळे डोळ्यांत पाणी येऊ लागले आहे.

दोन महिन्यांपूर्वी ६५० रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर अचानक ८०० रुपयांना झाला. यामुळे ग्रामीण भागात महिलांचे बजेट कोलमडले आहे. महिलांना सिलिंडरचा वापर करणे अशक्‍य झाले आहे. ‘सिलिंडरपेक्षा ती चूलच बरी’ असे ग्रामीण भागातील महिला बोलू लागल्या आहेत. ग्रामीण भागतील प्रत्येकी कुटुंबास दिवसभर मोलमजुरी करून महिन्यात ५ ते ६ हजार रुपयांची कमाई होते.

दरमहिन्याला आवश्‍यक असणाऱ्या डाळी, खाद्य तेल व वीजबिल असा खर्च न परवडणारा झाला आहे. त्यात या वाढलेल्या सिलिंडरच्या दरामुळे घरगुती बजेटही विस्कळित झाले आहे. ज्यांच्याकडे जनावरे आहेत त्यांनी शेणाच्या गोवऱ्या बनवून चुलीसाठी वापर करण्यास सुरुवात केली आहे. शासनाने केलेल्या या गॅसदरवाढीमुळे कमी उत्पन्न असलेल्या व सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा फटका बसत आहे. तसेच सर्वसामान्यांनी संसाराचा गाडा कसा ओढायचा, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषदेच्या विषय सभापती जाहीर

Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर रहाणेचा टीकाकारांवर हल्लाबोल; ‘माझं यश काहींना पचत नाही, माझ्याविरोधात ठरवून अजेंडा’

'मला त्यावेळी खूप त्रास होत होता' महिनाभर अंथरुणाला खिळलेला ललित प्रभाकर, आजाराबद्दल बोलताना म्हणाला...' जो त्रास होत होता तो...'

SCROLL FOR NEXT