पुणे

क्रांतिदिनी पुण्यात अश्वारूढ तिरंगा यात्रा

CD

पुणे, ता. ७ ः स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी क्रांतिदिनानिमित्त पुण्यात अश्वारूढ तिरंगा यात्रा संचलन आयोजित करण्यात आले आहे. दिग्विजय प्रतिष्ठान हॉर्स रायडिंग अकादमीतर्फे रविवारी (ता. ९) सकाळी ७.३० वाजता हे संचलन होणार असल्याची माहिती अकादमीचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी विनायक हळबे, नरेंद्र पाटील, जनक टेकाळे, समीर धर्माधिकारी आदी उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मंदिरापासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे. बेलबाग चौक, लक्ष्मी रस्ता, लोकमान्य टिळक चौक, छत्रपती संभाजी महाराज पुलामार्गे छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे यात्रेचा समारोप होईल. या संचलनात १५ प्रशिक्षित घोडेस्वार सहभागी होणार असून, यात आठ वर्षापासून ते ६० वर्षांपर्यंतचे अश्वारोहण करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी असणार आहेत. अश्वावर स्वार होऊन हातात तिरंगा ध्वज घेत अनोख्या पद्धतीने क्रांतिकारकांना अभिवादन केले जाणार आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT