to solve traffic jam dattanagar ambegaon pmpml bus stop move pmc  sakal
पुणे

Pune Traffic : दत्तनगर चौकातील PMPML BUS थांब्यांचे स्थलांतर; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमपीचा पुढाकार

पत्राची दखल घेत चौकातील बसथांबे स्थलांतरित करण्याची कार्यवाही पीमपीएल कडून सुरू

किशोर गरड

आंबेगाव : येथील दत्तनगर चौकातील वाहतूक कोंडी सातत्याने होत होती. यामध्ये अवजड वाहने,महापालिकेकडून रस्त्यांवर होते असलेल्या जलवाहिन्या,मलवाहिन्या देखभाल दुरुस्तीच्या कामांमुळे पडणारा राडारोडा याचबरोबर अरुंद रस्ते आणि त्यावरील अतिक्रमणे,

बेशिस्त वाहनचालक आणि चौकालगत  असणारे पीएमटी बसथांबे आदी कारणांनी दत्तनगर चौकात मोठ्याप्रमाणावर वाहतूक कोंडी होते आहे. आंबेगाव बुद्रुक,नऱ्हे, जांभूळवाडी-कोळेवाडी,धायरीकडे जाणाऱ्या बस या दत्तनगर चौकातून जात असतात.

त्यामुळे येथे थांबणाऱ्या पीएमटी बसेस ह्या चौकातील असणाऱ्या बसथांब्यावर उभ्या राहत होत्या. त्यामुळे पीएमटीच्या मागे वाहनांच्या रांगा लागत होत्या यातून कोंडी होत होती.ही बाब आंबेगावचे माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांच्या निदर्शनास आली.

त्यानंतर पाटील यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांना दत्तनगर चौकात उभ्या राहणाऱ्या पीएमटी बस थांबे  चौक सोडून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावेत असे विनंती पत्र दिले.

जेणेकरून चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल. पत्राची दखल घेत चौकातील बसथांबे स्थलांतरित करण्याची कार्यवाही पीमपीएल कडून सुरू करण्यात आली. यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास हातभार लागेल अशी आशा बेलदरे पाटील यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT