पुणे

सात लाख रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा पुण्यात जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तंबाखूजन्य पदार्थांवर आवश्‍यक वैधानिक इशारा नसतानाही विक्री केल्या जाणाऱ्या तब्बल सात लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाने जप्त केला. याबरोबरच बेकायदेशीरीत्या विविध कंपन्यांच्या इम्पोर्टेड सिगारेटही पोलिसांनी जप्त केल्या. 

अमली पदार्थ व खंडणी विरोधी विभागाच्या पुर्व विभागाचे पोलिस निरीक्षक विजय टिकोळे हे त्यांच्या पोलिस पथकासह शहरामध्ये गस्त घालीत होते. त्यावेळी फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश पेठ येथील पांगुळ आळीमध्ये असणाऱ्या एस.राजेश ट्रेडर्स या दुकानामध्ये बंदी असलेले व वैधानिक इशारा नसलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केली जात असल्याची खबर टिकोळे यांना मिळाली. त्यानुसार, टिकोळे यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुशील काकडे, पोलिस हवालदार महेंद्र पवार, पोलिस नाईक रामचंद्र यादव, पोलिस शिपाई योगेश मोहिते आदींच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी प्रकाश मोहनलाल जैनानी (वय 31, रा.नरेन हिल्स, आझादनगर, महम्मदवाडी, हडपसर) हा घटनास्थळी हजर होता.

दुकानाची पाहणी केल्यानंतर तेथे वैधानिक इशारा नसलेला तब्बल सात लाख रुपये किंमतीचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा सापडला. त्यानुसार, जैनानी याच्याविरुद्ध कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT