पुणे

टाकळी, सोनेसांगवी येथील टोळी तडीपार

CD

शिरूर, ता. १९ ः बेकायदा जमाव जमवून, रांजणगाव एमआयडीसी व परिसरात मारामाऱ्या, दहशत निर्माण करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला तडीपार करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. या टोळीने सामान्य नागरीकांना त्रास देण्याचे गंभीर गुन्हे केल्याने ही तडीपारीची कारवाई केल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
अक्षय अंबर पवार (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे), नीलेश ऊर्फ सोन्या पोपट डांगे, प्रमोद ऊर्फ सोनू शांताराम डांगे, राहुल बाबाजी कदम, अक्षय ज्ञानेश्वर
कदम व वैभव नारायण खिलारे (सर्व रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) अशी तडीपार केलेल्या टोळीतील तरुणांची नावे आहे. त्यांना पुणे जिल्ह्यातील शिरूरसह़ खेड, हवेली, दौंड, आंबेगाव व नगर जिल्ह्यातील पारनेर अशा सहा तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी तडीपार केले असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.
टाकळी व सोनेसांगवी या गावांतील हे तरुण स्थानिक असल्याच्या नावाखाली परिसरात व विशेषतः रांजणगाव एमआयडीसी क्षेत्रात दहशत माजवत होते. बेकायदा टोळी तयार करून मारामाऱ्या करणे, सामान्य नागरीकांना विनाकारण त्रास देणे असे गुन्हे वारंवार करीत होते. दहशतीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊनही व त्याबाबत वारंवार समज देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने त्यांच्याविरुद्ध तडीपारीचा अहवाल पोलिस उपनिरीक्षक विनोद शिंदे यांच्यामार्फत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांना सादर केला होता. त्यांनी शहानिशा करून अंतिम अहवाल जिल्हा पोलिस अधिक्षकांना सादर केला. या अहवालाची दखल त्यांनी घेतली व तरूणांच्या गंभीर गुन्ह्यांना चाप बसविण्यासाठी तडीपारीचे आदेश बजावले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक
बलवंत मांडगे यांनी दिली. तडीपारीच्या कालावधीत हे तरुण हद्दपार केलेल्या तालुक्यांत दिसून आल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT