पुणे

अजून किती दिवस मरणयातना सहन करायच्या?

CD

कुरकुंभ, ता. १ : नगर-सातारा राज्यमार्गाचे मनमाड- बंगलोर राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट होऊन रुंदीकरण झाले. रस्ता कॉंक्रीटीकरणही झाले. मात्र, तरीही दौंड-कुरकुंभ दरम्यानचे काम संथगतीने होत आहे. त्यामुळे कुरकुंभ घाट व माथ्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना अजून किती दिवस मरणयातना सहन कराव्या लागणार? असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे. मंगळवारी (ता. १) सकाळच्या कडाक्याच्या थंडीत कुरकुंभ घाटमाथ्यावरील खड्ड्यात राज्य परिवहन महामंडळाची बस बंद पडल्याने प्रवाशांना खाली उतरून रस्त्यालगत थंडीत कुडकुडावे लागले.
दौंड-बारामती रस्त्याचे दौंड ते गुंजखिळादरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सतत दुरुस्तीचे काम चालू असायचे. दुरुस्तीचे काम झाले की निकृष्ट कामामुळे पुन्हा खड्डे पडत होते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना सतत खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश होऊन मनमाड-बंगलोर दरम्यान रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे दौंड शहर ते गुंजखिळादरम्यानचा रस्त्यावरील खड्ड्यांचा त्रास संपून प्रवास सुखकर होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
नगर जिल्हातील रस्ता रुंदीकरणाची कामे जलदगतीने आराखड्याप्रमाणे व दर्जेदार झाली. मात्र, पुणे जिल्ह्यातील दौंड येथे भीमानदीपासून रस्त्याच्या कामाला अनेक अडचणी पार कराव्या लागल्या. रस्त्यालगतची अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने झाली. काही अतिक्रमणे काढली. काहींना राजकीय संरक्षण मिळाल्याने तशीच राहिली. त्यामुळे २४ मीटरचा रस्ता काही ठिकाणी नऊ मीटरपेक्षा कमी झाला. त्यामुळे आजही अपघात व वाहतूक कोंडी होत आहे. वनविभाग, भागवतवस्ती आणि कुरकुंभ घाट व माथ्यावरील काम रखडल्याने पावसाळ्यात खड्डे व चिखलामुळे प्रवाशांना मरणयातना सहन कराव्या लागल्या.
या रस्त्याचे नुकतेच वनविभाग व भागवतवस्ती येथील काम झाले. मात्र, कुरकुंभ घाट व माथ्यावरील काम जैसे थे आहे. घाटात रस्ता खोदल्याने व माथ्यावर मोठे खड्डे पडल्याने दीड किलोमीटर अंतरात प्रवासी व वाहनचालकांना मरणयातना सहन कराव्या लागतात. खड्ड्यांमुळे वाहने नादुरुस्त होणे, मणका व पाठीचे दुखणी वाढत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT