पुणे

पत्रकारांची वसाहत उभी करणार

CD

खळद, ता.३ : पुरंदर तालुक्यात पत्रकार संघाच्या विनंती नुसार बहुउद्देशीय पत्रकार भवन उभे करणार आहे. तसेच पत्रकारांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजने अंतर्गत पत्रकारांची वसाहत उभी करण्यासाठी देखील प्रयत्न केला जाईल. यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून मदत केली जाईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत सुदामआप्पा इंगळे मित्र परिवाराने पत्रकारांसाठी आरोग्य विमा उतरवण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले.
शिवरी (ता पुरंदर) येथील महात्मा जोतिराव फुले विद्यालयातील शरदचंद्रजी पवार सभाग्रहामध्ये सुदाम अप्पा इंगळे मित्र परिवाराच्या वतीने पत्रकारांना मोफत आरोग्य विमा पॉलिसी वाटप सुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय जगताप कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, बाळासाहेब कामथे, शंकरराव कामथे, महेश इंगळे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, अमोल बनकर, बी.एम.काळे,प्रकाश फाळके, प्रवीण नवले, चंद्रकांत चौडकर, संतोष डुबल, विशाल फडतरे, भारत निगडे, राहुल शिंदे, प्रकाश खाडे, किशोर कुदळे, श्रध्दा जोशी, दत्ता जाधव, संतोष जंगम, सुनीता कसबे, छाया नांनगुडे, हनुमंत वाघले यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधवांनी केले.
पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी प्रास्ताविक तर निखिल जगताप यांनी यांनी सूत्रसंचालन केले.

01396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT