पुणे

कांजळे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध

CD

नसरापूर, ता. १९ : भोर तालुक्यातील क्रमांक दोनचे मानांकन असलेली कांजळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चार गावांमधील सर्व तेरा संचालकांची निवड ग्रामस्थांनी बिनविरोध केली.
भोर तालुक्यातील कांजळे, वरवे खुर्द, वरवे बुद्रुक, साळवडे या चार गावची कांजळे विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक जाहीर झाली होती. चारही गावामधील नागरिक व ग्रामपंचायत पदाधिकारी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचा निर्धार केला. प्रत्येक गावामध्ये ठरवलेल्या संचालकांच्या संख्येनुसार सर्वानुमते संचालकांची निवड करण्यात आली.
या नुसार २०२१-२२ ते २०२६-२७ या

पाचवर्षासाठी कांजळे गावा मधून मीनाबाई हरिश्चंद्र जाधव, सोमनाथ भीमाजी जाधव, दत्तात्रेय दिनकर तांबट, भानुदास बबन जाधव या चार संचालकांची निवड ग्रामस्थांनी केली. तर वरवे खुर्द ग्रामस्थांनी महेंद्र मोहन भोरडे, सरस्वती ज्ञानोबा भोरडे, शिवाजी बाजीराव भोरडे, प्रकाश बजरंग भोसले या चार सदस्यांची निवड केली. वरवे बुद्रुक गावामधून धनाजी आनंदराव मोरे, मोहन रघुनाथ केदारे यांची निवड झाली. तर साळवडेमधुन तुकाराम मारुती सणस, रामचंद्र मारुती कांबळे, सुनील शंकर शिंदे या तीन संचालकांची निवड करण्यात आली. या सर्व बिनविरोध निवडीसाठी त्या-त्या गावामधील सर्व पक्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी एकमताने संचालकांची निवड केली या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एम. घायाळ यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT