पुणे

निमगाव येथे आढळले रानमांजराचे जखमी पिल्लू

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ८ : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील एका शेतात ऊसतोडणी चालू असताना रानमांजराचे पिल्लू आढळून आले, मात्र सुरवातीला ही पिल्ले बिबट्याची असल्याचा समज उपस्थितांचा झाला होता. त्यामुळे काहीवेळ घबराट पसरली होती.

येथील बाळासाहेब चव्हाण यांच्या शेतात ऊस तोडणी सुरु असताना कामगारांना बिबट्याच्या पिल्लांसारखी तीन पिल्ले दिसली. त्यानंतर गावकऱ्यांनी माहिती दिल्यावर वन्य पशुपक्षी संरक्षण संस्थेचे श्रीकांत भाडळे, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम माने यांनी शेतात येऊन पाहणी केली. त्यावेळी दोन पिल्ले उसाच्या शेतात पळून गेली तर एक जखमी पिल्लू त्या ठिकाणी मिळून आले. जखमी पिल्लाला त्यांनी ताब्यात घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन चव्हाण, प्रदीप पवार, रवींद्र चव्हाण, राजेश राठोड, नवनाथ चव्हाण उपस्थित होते. वनमजूर आनंदा हरगुडे, सर्पमित्र बाळासाहेब मोरे यांनी सदर जखमी रानमांजराला कात्रज येथील अनाथालयात दाखल केले. निमगाव म्हाळुंगी येथे आढळून आलेले पिल्लू बिबट्याचे नसून रानमांजराचे असल्याचे निदर्शनास आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Almatti Dam Water Storage : कोल्हापूर सांगलीला धडकी भरवणाऱ्या अलमट्टी, हिप्परगी धरणातील पाणीसाठा किती?; तज्ज्ञांनी दिली माहिती

Gadchiroli: आलापल्ली-सिरोंचा महामार्ग जड वाहतुकीस बंद!; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत येथून चालणार नाहीत अवजड वाहने

लॉर्ड्सच्या बाल्कनीतील तो ऐतिहासिक क्षण पुन्हा जिवंत; सौरव गांगुलीच्या भूमिकेत राजकुमार रावचा दमदार लूक

Kolhapur Flood News : पंचगंगा इशारा पातळीपासून अडीच फूट दूर, राधानगरी धरण परिसरात अतिवृष्टी; जिल्ह्यातील धरणात इतका पाणीसाठा

Latest Marathi News Live Update : मुळशी तालुक्यातील भुकूम परिसरात मुसळधार पावसामुळे सोसायटीची कंपाऊंड भिंत अचानक कोसळली

SCROLL FOR NEXT