पुणे

बारामतीत हॉकर्स झोन प्रत्यक्षात कधी येणार?

CD

बारामती, ता. २ ः शहरातील हॉकर्स झोनचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवण्यात आला आहे. प्रशासन व नगरसेवकांच्या स्तरावर या बाबत काहीच निर्णय होत नसल्याने रस्त्यावरील विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचीही कोंडी होते आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हॉकर्स झोन करण्याबाबत वारंवार चर्चा झाल्या, त्या साठी काही जागाही सुचविल्या गेल्या होत्या. मात्र, दर वेळेस काही ना काही कारणे काढून हॉकर्स झोनची निश्चिती झालीच नाही. शहराच्या काही भागात असे हॉकर्स झोन केले तर मुख्य रस्त्यावरील हातगाड्यांची संख्या कमी होऊन त्यांना हक्काची जागाही मिळू शकेल, असे अनेकांचे म्हणणे आहे.
या बाबत नगरपालिका प्रशासन, पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभागासह हातगाडी व्यावसायिकांनी एकत्र येत या वर मार्ग काढला पाहिजे.
शहरातील वर्दळीच्या चौकामध्ये तरी किमान हातगाडीचालक व अस्ताव्यस्त पार्किंग या दोन्ही समस्यांचे निराकरण प्रशासनाकडून करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात अनेक ठिकाणी रस्ते बऱ्यापैकी रुंद आहेत. मात्र, त्यावर होणारे अतिक्रमण व पार्किंग या मुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मनस्ताप सहन करावा लागतो. भिगवण रस्त्यावर तर अनेक ठिकाणी निम्मा रस्ता वाहनांच्या पार्किंगने व्यापलेला असल्याने चालक त्रस्त होतात.

पुनर्वसन गरजेचे....
शहरातील हातगाडीचालक, पथारी व्यावसायिकांची नेमकी संख्या किती याचा आकडा नगरपालिकेकडेही आहे का या बाबत साशंकताच आहे. मध्यतंरी याचे सर्वेक्षण केल्याचे सांगितले गेले. मात्र, त्याचा आकडा काही शेवटपर्यंत नगरपालिकेने जाहीर केला नाही. या व्यावसायिकांचे कोणतेही आर्थिक नुकसान न करता त्यांचे पुनर्वसन करूनच हा प्रश्न मार्गी लागावा अशी नागरिकांची इच्छा आहे. पथारी व्यावसायिक किंवा हातगाडी चालक यांनाही व्यवसाय करण्यासाठी योग्य जागा मिळायला हवी, मात्र यावर सर्वमान्य व सर्वंकष तोडगा कधी निघणार असा बारामतीकरांचा सवाल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT