पुणे

बजाज फायनान्स कंपनीची संगणक प्रणाली सुरक्षित

CD

पुणे, ता. १० : बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्याचा ईमेल कंपनीला प्राप्त झाला होता. याप्रकरणी कंपनीकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीची संगणक प्रणाली व कामकाज पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम झाला नाही, असे बजाज फायनान्स कंपनीने स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना धमकीचे ईमेल आले होते. त्याची गांभीर्याने दखल घेऊन व सावधगिरीचा उपाय म्हणून कंपनीने या फिशिंग ईमेलप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील कारवाईसाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत कंपनीकडून सहकार्य केले जात आहे. या घटनेमुळे कंपनीच्या प्रणालीवर किंवा कामकाजावर, सुरक्षेवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही. आपल्या सर्व प्रणाली सुरक्षित आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT