पुणे

शेलगाव सोसायटीच्या निवडणुकीत चुरस

CD

चाकण, ता. १५ : शेलगाव (ता. खेड) येथील शेलगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक दोन पॅनेलमध्ये चुरशीत झाली. या निवडणुकीत श्री भैरवनाथ गुरूदत्त शेतकरी विकास पॅनेलने वर्चस्व प्रस्थापित केले असल्याची माहिती संस्थेचे नव्याने निवडून आलेले संचालक रामहरी आवटे, विजयानंद आवटे यांनी दिली.
शेलगाव सोसायटी ही शेतकरी सभासदांची आहे. या सोसायटीचे चार संचालक बिनविरोध झाले होते. निवडणुकीत एकनाथ खंडू आवटे, रामहरी नामदेव आवटे, विजयानंद पोपट आवटे, सहादू बाबूराव आवटे, रविराज अशोक झरेकर, दत्तात्रेय सोपान हांडे, नवनाथ दत्तात्रेय आवटे, सचिन गंगाराम आवटे हे चुरशीच्या निवडणुकीत निवडून आले. तसेच नलिनी कालिदास गरुड, जयश्री कमलेश आवटे, संतोष विठ्ठल आवटे, दत्तात्रेय बबन सोनवणे हे चार संचालक बिनविरोध निवडून आले. एक संचालक जागा रिक्त राहिली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच. एस. कांबळे यांनी काम पाहिले. संस्थेचे एकूण तेरा संचालक आहेत. भटक्या विमुक्त जागेवर उमेदवार नसल्याने ती जागा रिक्त राहिली. संस्थेचे सुमारे दोनशेवर शेतकरी सभासद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT