पुणे

वाल्ह्यात ‘नाथ साहेबांचं चांगभलं’चा गजर

CD

वाल्हे, ता. ३१ : सोमवती अमावस्येनिमित्त ‘नाथ साहेबांचं चांगभलं’च्या जयघोषात वाल्हे (ता. पुरंदर) येथील श्री भैरवनाथ, देवी जोगेश्वरी व श्रींच्या कावडीला वीर घोडेउड्डाण येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत नीरा स्नान घालण्यात आले. यावेळी नदी परिसर भक्तीमय वातावरणात गजबजून गेला होता.
वाल्हे (ता. पुरंदर) येथे वर्षानुवर्षाची परंपरा जपत पारंपरिक ढोलांच्या तालावर उत्सवमूर्तींना पालखीत बसविण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गावांतर्गत पालखीची व श्रींच्या कावडीची पारंपरिक वाद्यांच्या तालावर मिरवणूक काढून ‘नाथ साहेबांचं चांगभलं’च्या जयघोषात पालखी नीरा नदीवरील घोडेउड्डाण येथे नेण्यात आली.
यावेळी प्रवीण भुजबळ, सागर भुजबळ, अरुण पवार, मंगेश कुंभार, प्रकाश कुंभार, संग्राम भुजबळ, निशांत भुजबळ, कुणाल भुजबळ, दिनेश कुंभार, उमेश भुजबळ, विकास भुजबळ आदींसह मानकरी, सालकरी तसेच ग्रामस्थांनी सहभागी होऊन उत्सवमूर्तींना जलाभिषेक घातला. स्नानानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये समाजआरती करण्यात आली. साईराज आगलावे यांनी पौराहित्य केले. यावेळी मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर महाप्रसादाचा नैवेद्य घेऊन मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. पालख्या पुन्हा गावाकडे मार्गस्थ झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: आधी शमीने धक्के दिले अन् मग नितीश रेड्डी-क्लासेनने LSG च्या गोलंदाजांना फोडलं; SRH चा १५० धावांचा टप्पा पार

२० वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं हाताची नस कापली, मनगटावर १८ वेळा वार; का उचललं टोकाचं पाऊल

Pune Crime: पुण्यात १७ वर्षीय तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, २१ वर्षीय तरुणानं फोटो व्हायरल करण्याची दिली होती धमकी!

Jawkheda Thombre farm fire: जवखेडा ठोंबरे येथे शेतकऱ्याच्या शेडला भीषण आग; ज्वारी कडबा, भुस व औजारे जळून सुमारे ३ लाखांचे नुकसान

Latur sandalwood smuggling news: लोहा-चाकूर परिसरात भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये लपवलेले ३६.७५ लाखांचे चंदन जप्त; तिघांना अटक, ५१.९६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT