covid 19
covid 19 covid 19
पुणे

भोर पंचायत समितीत कोरोना चाचणीशिवाय प्रवेश नाही

CD

भोर, ता. १७ : पंचायत समितीमध्ये जाण्यासाठी कोरोना चाचणी आवश्यक करण्यात आली असून कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची आरोग्य विभागामार्फत कोरोनाची चाचणी केली जात आहे. कोरोनाची अँटीजेन चाचणी केल्यावरच संबंधीतास कार्यालयात प्रवेश दिला जात आहे.

गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांच्या सूचनेनुसार तालुका वैद्यकीय विभागाने गेल्या आठ दिवसांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. पंचायत समितीच्या मुख्य दरवाजालगत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आरोग्य विभागाचे पथक कार्यरत रहात आहे. गेल्या आठ दिवसांपासून ७०० पेक्षा जास्त जणांची चाचणी केली. त्यापैकी सुमारे ४० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी करून त्यांना घरीच क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे. सोमवारी (ता.१७) दुपारी तीन वाजेपर्यंत ९० जणांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये ७ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासाठी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारी महिनाअखेरपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी सांगितले. यामुळे विनाकारण पंचायत समितीमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी झाली असून कर्मचाऱ्यांना काम करण्यास वेळ मिळत आहे.

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने सुरू केलेला हा उपक्रम सर्वांसाठी लाभदायक आणि फायद्याचा आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या उपक्रमाची गरज असल्यामुळे नागरिकांबरोबर पदाधिकारी, अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य करावे.
- लहू शेलार, सभापती, पंचायत समिती, भोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT