वाल्हे, ता. १८ : शिव जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असली तरी कोरोना, ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंग पाळत शिव जयंती साजरी करण्याचे आवाहन जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी केले.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शिव जयंतीबाबत सार्वजनिक मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी जेजुरी पोलिस ठाण्याच्या वतीने वाल्हे (ता. पुरंदर) पोलिस दुरक्षेत्र येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेत पोलिस निरीक्षक तावसकर यांनी मार्गदर्शन केले.
तावसकर पुढे म्हणाले, ‘‘सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार शिवज्योत आणण्यासाठी दोनशे शिवभक्तांना परवानगी असून पाचशे शिवभक्तांना उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित राहता येईल. मात्र, हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्यात यावा. गर्दी होईल असा जल्लोष न करता आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्यात यावे. सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आॅनलाईन प्रक्षेपण करावे. बाईकरॅली, प्रभातफेरी, मिरवणुका टाळून शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोशल डिस्टन्सिंगमध्ये जयंती साजरी करावी.’’
या प्रसंगी सरपंच अमोल खवले, संदेश पवार, प्रकाश शिंदे, राहुल जगताप, सागर पवार, सूरज पवार, स्वप्नील ढवळे, योगीराज जगताप, अतुल पवार, नीलेश गायकवाड, यश जाधव आदींसह परिसरातील तरुण मंडळातील सदस्य उपस्थित होते. वाल्हे पोलिस औटपोस्टचे प्रशांत पवार यांनी प्रास्ताविक केले. संतोष मदने यांनी आभार मानले.
44026
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.