पुणे

मदनवाडी येथे शिबीरात १५३ जणांची आरोग्य तपासणी

CD

भिगवण, ता. २० : मदनवाडी (ता. इंदापूर) येथील शिव फाउंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात १५३ जणांनी लाभ घेतला. त्यानंतर सल्ला शिबिर आयोजित करून आरोग्य सल्ला देण्यात आला. आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनाप्रसंगी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मारुती वणवे, कर्मयोगाचे पराग जाधव, विश्वास देवकाते, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, कुंडलिक बंडगर, तेजस देवकाते, रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे, सचिन बोगावत, संजय चौधरी, डॉ. संकेत मोरे, डॉ. अमोल खानावरे, डॉ. मृदुला जगताप, शिव फाउंडेशनचे अध्यक्ष संपत बंडगर आदी उपस्थित होते. डॉ. प्रवीण बडे यांचे प्रिस्टाईन आयुर इंडिया प्रा. लि. व मातोश्री प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून जर्मन टेक्नॉलॉजी मशिन द्वारे मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. सरपंच तानाजी वायसे, शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी आरोग्य सल्लागार किशोर शिंदे, डॉ. परशुराम तळेकर, डॉ. गोरक्षनाथ चौधरी तसेच शिव फाउंडेशन व मातोश्री प्रतिष्ठानच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. येथील ओंकार गाढवे मित्र परिवाराच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पराग जाधव, अजिंक्य माडगे, महेश शेंडगे,प्रदीप वाकसे, सचिन बोगावत, अण्णासाहेब धवडे, संजय देहाडे, तुषार क्षीरसागर, संजय रायसोनी, प्रशांत शेलार, प्रमोद नरूटे, बाबासाहेब शिंदे, जावेद शेख, दत्ता धवडे आदी उपस्थित होते. ओंकार गाढवे, स्वप्नील रसाळ, ओंकार मुळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT