पुणे

साहित्यक्षेत्रात यावर्षीपासून ‘विभावरी शिरूरकर पुरस्कार’

CD

शिरूर, ता. २६ : आपल्या अमूल्य साहित्यिक योगदानातून व विशेषतः महिलांविषयक सकस लेखनातून मराठी साहित्यक्षेत्रात एक वेगळे स्थान असलेल्या प्रतिभावान लेखिका विभावरी शिरूरकर यांच्या स्मरणार्थ ‘विभावरी शिरूरकर पुरस्कार’ या वर्षीपासून सुरू करण्यात आला. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान व शिरूर साहित्य परिषदेने यासाठी पुढाकार घेतला.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. मानचिन्ह, सन्मानपत्र व २५ हजार रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप असून, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकास व शक्‍यतो नवोदित साहित्यिकास दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्काराचे हे पहिले वर्ष असून, या पुरस्कारासाठी, साहित्यिकांनी आपली साहित्य संपदा व माहिती संस्थेच्या sharadkrida2020@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य शामकांत वर्पे, साहित्य परिषद शिरूर शाखेचे अध्यक्ष नीलेश खाबिया, उपाध्यक्ष सतीश धुमाळ उपस्थित होते.

बंडखोर लेखिका म्हणून ओळख
बाळूताई खरे असे नाव असलेल्या विभावरी यांचे बालपण शिरूरमधील एका वाड्यात गेले. विश्राम बेडेकर यांच्याशी विवाहानंतर त्या मालती बेडेकर झाल्या. बंडखोर लेखिका म्हणून महिलांच्या समस्यांना वाचा फोडताना ‘विभावरी शिरूरकर’ या नावाने त्यांनी सकस व दर्जेदार लिखाण केले. स्त्रीकेंद्री अनुभवांना साहित्यरूप देताना केवळ कौटुंबिक, सामाजिक वास्तवाची चिकित्सा करून चालणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी साहित्य निर्माण केले. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात त्यांच्या साहित्याने झंझावाती वादळ निर्माण केले. कथा, कादंबरी, दीर्घ कथा, समाजशास्त्रीय लेखन या सर्व वाड्‌मय प्रकारात त्यांनी महत्त्वपूर्ण भर घातली. विभावरी यांच्या साहित्यातून आत्मभान जागृत झालेल्या स्त्रीचे दर्शन घडविले, नव्या स्त्रीचे नवे प्रश्‍न, तिची मानसिक आंदोलने त्यांच्यामुळेच कथांमध्ये उमटू शकली. अनेक सामाजिक प्रश्‍नांकडे त्यांनी त्यांच्या लिखाणातून लक्ष वेधले. स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचे लिखाण करणाऱ्या बंडखोर लेखिका म्हणून त्यांना ओळखले जाते.

साहित्यसंपदा
१) अलंकार, मंजुषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ
२) स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा कळ्यांचे निःश्‍वास पहिला कथासंग्रह (सन १९३३)
३) हिंदोळ्यावर (१९३४),
४) विरलेले स्वप्न (१९३४),
५) बळी (१९५०),
६) जाई आणि शबरी कादंबऱ्या
७) पारध, हिरा जो भंगला नाही ही नाटके
८) घराला मुकलेल्या स्त्रिया (समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख)
९) मनःस्वीचे चिंतन (निबंध संग्रह)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

Latest Maharashtra News Updates Live : नांदणी मठानं याचिका दाखल करावी- मुख्यमंत्री फडणवीस

संतापजनक! पतीकडून सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची चाकूने भोसकून हत्या, सपना जोरजोरात ओरडत होती पण..; खोलीभर पसरलं होतं रक्त

Godavari River: अंबड तालुक्यातील तरुण युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

Karad News: 'रस्त्यांचे हक्क उठविण्यासाठी सर्व्हे'; घरकुलांसाठी मिळणार जागा; बेघरांना लाभ, अतिक्रमणेही होणार नियमित

SCROLL FOR NEXT