पुणे

ज्ञानदीप विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

CD

आंबेठाण, ता. १६ : शिवे (ता. खेड) येथील ज्ञानदीप विद्यालयात २२ वर्षांपूर्वी दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा पार पडला. विद्यालयाच्या सभागृहामध्ये १९९९-२००० या शैक्षणिक वर्षात दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा वर्ग भरवण्यात आला. तत्कालीन दहावीच्या वर्गातील ३५ पैकी २८ माजी विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.
स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय भांडवलकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन दहावीच्या बॅचचे वर्गशिक्षक राजेंद्र पारवे उपस्थित होते.
या स्नेहमेळाव्यात सर्वांनी मनोगते व्यक्त करीत स्वतःचा परिचय करून दिला. तर काहींनी कविता, गवळण गायन करून कार्यक्रमात रंगत आणली. शिक्षकांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
२२ वर्षांनंतर होणाऱ्या या स्नेहमेळाव्यासाठी राहुल देशमुख, डॉ. संदीप शिवेकर, सत्यवान गडदे, शंकर गडदे, बाळासाहेब शिवेकर यांनी सहकार्य केले. आभार माजी विद्यार्थी महेश घाडगे यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT