पुणे

शेलू-भांबोली सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम पडवळ

CD

आंबेठाण, ता. २ : शेलू-भांबोली (ता.खेड ) विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम बबन पडवळ यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष शिवाजी हनुमंत पडवळ यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी तुकाराम पडवळ यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तुकाराम पडवळ यांनी यापूर्वी १५ वर्ष सोसायटीचे संचालक म्हणून काम पाहिले. राजगुरुनगर येथील बाजार समितीच्या सभागृहात ही निवडणूक पार पडली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष शिवाजी पडवळ, उपाध्यक्ष चांगुणाबाई राळे, नामदेव पडवळ, ज्ञानेश्वर ठोंबरे, मीराबाई पडवळ, पांडुरंग सांडभोर, काळूराम पिंजण, शरद निखाडे, संतोष सांडभोर, संदीप बधाले, मिलिंद दिवे, शांताराम करंडे, कांताबाई निखाडे, मुरलीधर राऊत आदी उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव करंडे, आबा सांडभोर, दत्तात्रेय करंडे, दत्ता लांडगे, पांडुरंग पडवळ, गणेश नामदेव पडवळ, भरत पडवळ, माऊली पडवळ आदींनी प्रयत्न केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एम.बगाटे यांनी काम पाहिले, त्यांना सोसायटीचे सचिव नीलेश देशमुख यांनी मदत केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT