पुणे

बिरदवडी परिसरातील क्रॅश बॅरियरची चोरी

CD

आंबेठाण, ता. ९ : बिरदवडी परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले क्रॅश बॅरियर अज्ञातांकडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. धोकादायक ठिकाणी अपघात होऊ नये, यासाठी हे क्रॅश बॅरियर उभारले आहेत. पण ते विकले की पैसे मिळतात, या उद्देशाने क्रॅश बॅरियर रात्रीच्या वेळी चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत असून तत्काळ, अशी चोरी करणारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चाकण एमआयडीसी भागात विविध रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्यात आले आहे. यात म्हाळुंगे इंगळे ते बिरदवडी मार्गे भाम फाटा या रस्त्याच्या ‘पीएमआरडीए’कडून डांबरीकरण केले आहे. याशिवाय चाकण ते भांबोली फाटा आणि वासुली फाटा ते करंजविहिरे हा रस्ता हायब्रीड ऑन्युटी या योजनेतून सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आला. याशिवाय एमआयडीसी भागात अनेक रस्ते नवीन केले आहेत. नव्याने झालेल्या या मार्गावर अपघात होऊ नये यासाठी क्रॅश बॅरियर उभारण्यात आले आहेत. परंतु, सध्या या मार्गावर उभे केलेल्या लोखंडी क्रॅश बॅरियरचे नट-बोल्ट खोलून ते चोरी केले जात आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत रोज थोडे थोडे भाग खुले केले जातात. आणि अचानक एक दिवस हे लोखंडी भाग गायब केले जातात.

एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी असे लोखंडी सुरक्षा कठडे चोरी केले जात असून ही लज्जास्पद बाब आहे. असे कठडे नसल्याने वाहनचालक आणि प्रवासी यांच्या जिवाला धोका पोचू शकतो. प्रशासनाने अशा चोरांवर कडक कारवाई करावी.
- बाबाजी ढोबळे, प्रवासी

क्रॅश बॅरियर हे अपघाताची शक्यता असणाऱ्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेसाठी लावले जातात. परंतु, त्याची चोरी होणे ही दुर्दैवाची बाब आहे. प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेसाठी याची चोरी न होणे गरजेचे आहे. जर कोणी अशी चोरी करताना आढळले तर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
- संतोष पवार, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune–Mumbai Expressway Traffic : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर निघालात? आधी हे वाचा, वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

ASHOK KHARAT CASE: 'समोरच्याला भोंदू म्हणण्यापेक्षा आपण...' अशोक खरात प्रकरणी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला..

Latest Marathi News Live Update : सोनिया गांधी उपचारांना प्रतिसाद देत आहेत, रुग्णालयाची माहिती

Ashok Kharat Case : "अशोक खरातला मारून टाका", भोंदूबाबाच्या कारनाम्यावर संभाजी भिडे संतापले

Gold Rate Today: अमेरिकेच्या हालचालींनी सोनं हललं! महाराष्ट्रात आजचा ताजा भाव किती?

SCROLL FOR NEXT