पुणे

भामा आसखेड चारही दरवाजातून विसर्ग

CD

आंबेठाण, ता.२७ : खेड तालुक्यातील पश्चिम भागात सतत कोसळत असणाऱ्या पावसाने भामा आसखेड (ता. खेड) धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. हा विसर्ग मंगळवारी सकाळी (ता. २७ ) ११ वाजल्यापासून ३६१६ क्युसेकवरून वाढवून ६९७९ क्युसेक एवढा करण्यात आला आहे.
सध्या भामा आसखेड धरण १०० टक्के भरले आहे.या विसर्गासाठी धरणाचे चारही दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण असून धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. चालू वर्षी धरण परिसरात १ जून पासून ११८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली तर मागील पूर्ण वर्षात धरण क्षेत्रात अवघ्या ८१३ मिलिमीटर पावसाची नोंद केली होती. यावरून यावर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे दिसत आहे.
सध्या धरणात एकूण पाणीसाठा ८.१४ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा ७.६७ टीएमसी इतका आहे तर मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ८६.८७ टक्के पाणीसाठा होता.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे कोणीही नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावे असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी दिली आहे.
03003

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT