आंबेठाण, ता. १२ : चाकण औद्योगिक वसाहतीमधील किंगफा सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी इंडिया कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून शिवे (ता. खेड) येथे वाचनालयासह विविध कामांसाठी निधी देण्यात आला. या निधीतून शिवे येथील कै. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाच्या संपूर्ण इमारतीला रंगकाम, वाचनालयाच्या मागील बाजूस खोली बांधकाम व संपूर्ण इमारतीला कार्पेट आणि पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाटे आदी साहित्य देण्यात आले. याप्रसंगी ए. मनिकंदन, रोहिदास गडदे, राहुल कुंभारे, सचिन पानमंद, मंजुश्री रेड्डी, आरती तावा, अनिल शेकडे, विवेक थिगळे, दर्शन भोले, विनायक शिवेकर, शांताराम गडदे, रामदास शिवेकर, नामदेव गडदे, रामचंद्र गडदे, पांडुरंग सातपुते, दत्तू गडदे, शंकरराव साळुंखे, दत्तात्रेय गडदे, दादाभाऊ शिवेकर, दारकू गडदे, भागूजी शिवेकर, शांताराम गिधे, समीर गडदे, गणेश गडदे, किसन शिवेकर, प्रतीक गडदे, ग्रामपंचायत सदस्या ललिता गडदे, ज्योती पोमन, जानवी गडदे यांच्यासह ग्रामस्थ, ज्ञानदीप विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी तसेच वाचनालयाचे कर्मचारी व संचालक उपस्थित होते. रोहिदास गडदे यांनी प्रास्ताविक केले. वाचनालयाचे अध्यक्ष संजय शिवेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील बारवेकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.