आंबेठाण, ता. ११ : भामा आसखेड (ता. खेड) धरणातून चालू वर्षीच्या हंगामातील उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. या आवर्तनातून आलेगाव पागापर्यंत असणारे बंधारे भरले जाणार आहेत. सध्या धरणात ४८.२६ टक्के (४.१७ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात ३१.६९ टक्के पाणीसाठा होता.
धरणाच्या आयपीसीओमधून १२०० क्यूसेकने हे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा ४८.२६ टक्के (४.१७ टीएमसी) आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ३.६९ टीएमसी इतका आहे. आगामी उन्हाळ्याची चाहूल आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणी जपून वापरावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) आश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे- देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.