पुणे

भामा आसखेडमध्ये १५ टक्केच पाणीसाठा

CD

आंबेठाण, ता. १५ : खेड, शिरूरसह पुणे शहराच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या भामा आसखेड (ता.खेड) धरणात गुरुवार (ता. १५ ) १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा जवळपास पाच टक्क्यांनी कमी आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात २०.२५ टक्के पाणीसाठा शिल्लक होता.
भामा आसखेड हे खेड तालुक्यातील पश्चिम भागात भामा नदीवर उभारलेले मातीचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता ८.१४ टीएमसी इतकी आहे. धरणात सध्या एकूण पाणीसाठा हा १.६३ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा १.१६ टीएमसी इतका आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला धरणात २०.२५ टक्के पाणीसाठा होता.

मागील ३० दिवसांपासून नदीपात्रात आयसीपीओ मधून १२०० क्युसेक वेगाने उन्हाळ्यातील दुसरे आवर्तन सुरू होते. दरम्यान, ३० दिवस सुरू असलेल्या या आवर्तनातून आलेगाव पागापर्यंत असणारे १८ बंधारे आणि त्यापुढील दौड तालुक्यातील ६ बंधारे भरण्यात आले होते.
धरणातून पुणे शहराच्या पूर्व भागासह तीर्थक्षेत्र आळंदीला पाणीपुरवठा केला जात आहे. या धरणातून पुढील काळात पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पिंपरी चिंचवड करिता भामा आसखेड धरणातून २.१४ टीएमसी पाणीसाठा देण्यात येणार आहे.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन
आगामी पावसाचे प्रमाण माहीत नसल्याने आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता पाणी जपून वापरावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता (श्रेणी १) अश्विन पवार, शाखा अभियंता नीलेश घारे-देशमुख, कालवा निरीक्षक वसंत ढोकरे यांनी केले आहे.

06388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT