आंबेठाण,ता.२९ : फक्त पुणेच नाही तर बाराही जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी उमेदवाराला मदत केली तर तीच अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असे मत पंचायत राज व्यवस्थेचे मार्गदर्शक भास्करराव पेरे पाटील यांनी वराळे येथे व्यक्त केले.
वराळे (ता.खेड ) येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना (ता. २९) श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. यावेळी दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितले की, अजितदादा खेड तालुक्यात प्रचारासाठी येणार होते. त्यांच्या जाण्याने लाखो कार्यकर्त्यांची स्वप्ने भंगली. निधीबाबत दादा अतिशय दिलदार होते. कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी त्यांनी कायम पाठिंबा दिला.
माजी सभापती शरद बुट्टेपाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्याला अजितदादांच्या नावाने ओळख आहे. दादांनी केलेल्या कामाचे कधी प्रदर्शन केले नाही. मी विरोधी पक्षात असताना देखील दादांनी माझी कामे केली. दादांइतका दिलदार नेता आजवर भेटला नाही.
दरम्यान, अजितदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी पवार कुटुंबाच्या मागे उभे राहू अशी भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, अरुण चांभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे, सुरेश शिंदे, अशोक खांडेभराड, खेड राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, कैलास लिंभोरे, गणेश बोत्रे, चांगदेव शिवेकर, जयसिंग दरेकर, कैलास टाकळकर, अमोल पानमंद, सखाराम शिंदे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी दशरथ काचोळे, राजू झांबरे, दत्ता देशमुख, अश्विनी मोरे, मचिंद्र भुजबळ,अक्षय गाडे आदींनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आजवर त्यांना अजित पवार यांच्यासोबतीत आलेले अनुभव आणि त्यांची काम करण्याची पद्धत याबाबतचे अनुभव व्यक्त केले. बहुतांश कार्यकर्त्यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते.
सुनील देवकर यांनी सूत्रसंचालन केले. abt 29 p1.
03539
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.