पुणे

शिंदेगावात इमारतीवर उभारला अश्वारूढ पुतळा

CD

आंबेठाण, ता. २३ : शिंदेगाव (ता. खेड) येथे माजी सैनिक दत्तात्रेय टेमगिरे यांनी त्यांच्या चार मजली इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. त्यांच्या या शिवप्रेमाचे समाजात आणि विशेषतः सोशल मीडियामध्ये कौतुक केले जात आहे.
टेमगिरे हे भारतीय सैन्य दलातील निवृत्त सैनिक असून, परखड स्वभाव आणि प्रचंड देशभक्ती, अशी त्यांची ओळख आहे. तसेच, ते खेड तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत. शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी त्यांना जवळपास चार लाख रुपयांचा खर्च आला आहे.
यावेळी माजी सैनिक दत्तात्रेय टेमगिरे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासकालीन व्यक्ती नव्हते, तर त्यांचे विचार आजही सर्वांसाठी आदर्शवत आहेत. पुढील काळात जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पाहिल, त्यावेळी त्यांना महाराजांचे नेतृत्व, शौर्य याची आठवण होऊन त्यातून प्रेरणा मिळेल.’’

03559, 03560

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Politics : पंधरा दिवसांपूर्वी रुजू झालेले सहायक दुग्ध निबंधक कदम यांची तडकाफडकी बदली, गोकुळचे राजकारण तापलं; मुश्रीफांना अप्रत्यक्ष दणका

IPL 2026: कोलकता संघाला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; गुजरातशी आज अहमदाबादमध्ये लढणार, रहाणेच्या नेतृत्वाचा कस, कशी असेल Playing XI

Leopard Rescue Chalisgaon : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत, पण शेतकऱ्याच्या एका फोनमुळे वाचले आयुष्य; चाळीसगावातील रेस्क्यूचा असा झाला शेवट

Beed News: बीडमध्ये उष्णतेचा कहर; दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट; तापमान ४२°C; शहरात उन्हाचा कडाका पाहायला मिळाला

इंडिया आघाडीच्या एकजुटीने मोदी सरकारची उडाली झोप, मोदी-शहांना आता विरोधकांत फुटीची आशा

SCROLL FOR NEXT