पुणे

आंबेठाण येथे आपत्कालीन यंत्रणेचे मॉकड्रिल

CD

आंबेठाण, ता. २० : आंबेठाण (ता. खेड) येथे युसीएसपीएल एलपीजी पाइपलाइनवर आयोजित करण्यात आलेली ऑफसाईट लेव्हल-३ आपत्कालीन प्रतिसाद आपत्ती व्यवस्थापन योजना मॉकड्रिल झाले. पाइपलाइन क्षेत्रात उद्भवू शकणाऱ्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा किती सज्ज आहे याची पडताळणी या सरावाच्या माध्यमातून करण्यात आली.
या सराव मोहिमेत तांत्रिक बिघाड किंवा गळती सारख्या प्रसंगी विविध विभागांमधील समन्वय, प्रतिसादाचा वेग आणि संसाधनांचा वापर कशा प्रकारे केला जातो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. एमपीएसपीएल तळेगाव टीमच्या समन्वयाने पार पडलेल्या या कार्यक्रमाला एमपीएसपीएलचे डीजीएम नितीन दलाल आणि युसीएसपीएलचे डीजीएम अभिषेक अगरकर उपस्थित होते.
या मॉकड्रिलमध्ये जिल्हा प्रशासन, पोलिस दल, अग्निशमन विभाग, वैद्यकीय सेवा आणि एनडीआरएफ पथकाने सहभाग नोंदवला. यावेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाचे अधिकारी आणि एमपीएसपीएलच्या सक्षम प्राधिकरणाने या सरावाचे निरीक्षण केले.आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थ्यांनाही हे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.
या सरावादरम्यान सर्व यंत्रणांचा प्रतिसाद प्रभावी असल्याचे दिसून आले. संवाद प्रणाली आणि विविध विभागांमधील समन्वय यामुळे कमीत कमी वेळात परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया आता होणार अधिक स्मार्ट! गर्दी कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; मेगा प्लॅन काय?

Manchar News : ‘पाणी नको, सिलिंग हटवा’चा नारा; आंबेगावात शेतकऱ्यांची एकजूट, न्यायालयीन लढ्याचा निर्धार

स्वामी भक्तांना अनोखी भेट; श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त “स्वामी गुरुमाऊली” गाणं प्रदर्शित

YIN Elections : ‘यिन’ निवडणुकीचा जल्लोष! तरुणाईचा उत्साह, गुलालाची उधळण, दुचाकी रॅली; विजयानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT