पुणे

कुरुळी शाळेतील बाजारात २५ हजारांची उलाढाल

CD

आंधळगाव, ता. ३ : कुरुळी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात शनिवारी (ता. २४) बाल आनंदी बाजार भरविला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचे आर्थिक ज्ञान वाढण्यासाठी ज्ञानरचनावाद उपक्रम म्हणून शाळेत बाल आनंदी बाजार भरविण्यात आला होता.
विविध प्रकारचा भाजीपाला, किराणा मालाचे दुकान, स्टेशनरी, बिस्किटे, सामोसे, वडे, पाणीपुरी, इडली सांबर, चहा, लस्सी, बासुंदी अशा खाद्यपदार्थांची दुकाने विद्यार्थ्यांनी थाटली होती. कार्यक्रमाचे उद्‍घाटन उपसरपंच श्याम हरिहर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष राहुल बोरकर, उपाध्यक्ष शारदा ढवळे, प्रतिभा बोरकर, ज्योती बोरकर, अश्विनी बोरकर, लक्ष्मी रणदिवे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य, नम्रता, संभाषण, आत्मविश्वास, गणन क्रिया, धीटपणा या गुणांचा विकास व्हावा. तसेच संतुलित आहाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, या साठी हा आनंदी बाजार भरविण्यात आला होता, असे शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे यांनी सांगितले.
आनंदी बाजारात २५ हजारांची उलाढाल झाली. ग्रामस्थ आणि पालक यांनी खरेदी करून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक जालिंदर दुर्गे, कैलास लंघे, भाऊसाहेब दुर्गे, दयाराम बर्वे, संगीता पोटे, वैशाली बेंद्रे, अलका गाडेकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

ADL24A00850

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० टक्के पेट्रोलचा पर्याय हवा, E20 जनता पार्टीची मागणी; २४ तासात लाखो फॉलोअर्स, कुणी सुरू केली आणि काय आहेत मागण्या?

Milk Dairy License: दूध डेअरींना मोठा दिलासा! तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर नियम न पाळता कारवाई; परवाने निलंबनाला हायकोर्टाची स्थगिती

Latest Marathi News Live Update : जंतर-मंतर आंदोलन प्रकरणात मोठी घडामोड; PM मोदी, केंद्र सरकारविरोधातील सोशल मीडिया पोस्ट हटविण्याचे दिल्ली पोलिसांचे आदेश

Team India Schedule: झिम्बाब्वे दौरा संपला, आता टीम इंडिया कधी दिसणार अ‍ॅक्शनमध्ये, जाणून घ्या पुढच्या मालिकेचे वेळापत्रक

Sahasrakund Waterfall Remains Dry: जुलैअखेरही प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा कोरडाच, तर ‘सीता न्हाणी’ धबधबा प्रवाही

SCROLL FOR NEXT