मांडवगण फराटा, ता. १८ : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील आंधळगाव ते तांदळी रस्त्यावर मांडवगण फराटा गावच्या हद्दीत कोळपेवस्ती परिसरात वठलेले एक झाड सध्या अपघाताला निमंत्रण देत आहे. वादळी वाऱ्याने हे जुनाट झाड अचानक उन्मळून कोलमडून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी मार्गावरील धोकादायक असलेली हे झाड हटविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
आंधळगाव ते तांदळी या मार्गावर गेल्या वर्षी झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. तर काही झाडेच वठली आहेत. त्यामुळे केव्हा, कधी हे वठलेले झाड गाडीवर, अंगावर पडेल, याची शाश्वती देता येत नाही. अचानक उन्मळून पडणाऱ्या झाडांमुळे अनेक वाहनांची मोडतोड होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या दुतर्फा तुटलेल्या आणि वठलेल्या झाडांबाबत संबंधित विभाग कोणताच निर्णय घेत नाही. दुर्घटना घडल्यानंतर ही झाडे हटवून उपयोग काय, असा सवालही प्रवासी वर्गातून उपस्थित होत आहे. उन्हाळ्यास प्रारंभ झाला असून, ही जुनी झाडे लवकर हटविली तर भविष्यात एखादी मोठी दुर्घटना टळू शकेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा असलेले हे धोकादायक झाड हटविण्याची कार्यवाही तत्पर करावी, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
दरम्यान सार्वजनिक बांधकाम शिरूर उपविभागाचे शाखा अभियंता रणजित धाइगडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका
या परिसरात शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. ते सायकल, चालत व बसने याच मार्गावरून जातात. हे जुनाट व धोकादायक झाड अचानक कोसळल्यास त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
रस्त्यावर कोसळणारी झाडे व फांद्या लक्षात घेता वाळलेली व धोकादायक झाडे तसेच झाडांच्या फांद्या कापणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील अनर्थ टळेल.
- सतीश फराटे, प्रवासी, मांडवगण फराटा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.