मांडवगण फराटा, ता. ४ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील केशव दत्तात्रेय खोमणे यांनी आपली भारतीय सैन्यातील १७ वर्षांची प्रदीर्घ सेवा संपवून हवालदार पदावर सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते आपल्या जन्मगावी आल्यानंतर येथील माजी सैनिक संघटना व ग्रामस्थांच्यावतीने रविवारी (ता.२) त्यांची सवाद्य मिरवणूक काढून नागरी सन्मान करण्यात आला.
नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर खोमणे यांनी आपल्या सतरा वर्षांच्या कारकिर्दीत जम्मू काश्मीर या ठिकाणी बारा वर्ष सेवा बजावली. त्यानंतर चार वर्ष नाशिक व एक वर्ष पंजाब येथे सेवा बजावली. नुकतेच ते हवालदार या पदावर लष्करातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती नंतर आज ते आपल्या जन्मगावी दाखल झाले. यावेळी गावातील आजी सैनिक संघटना, तरुण मंडळे व ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी त्यांची सजवलेल्या मोटार गाडीतून पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची मुक्त उधळण करीत सहकुटुंब सवाद्य मिरवणूक काढली. त्यानंतर केशव खोमणे यांसह त्यांचे वडील दत्तात्रेय खोमणे,त्यांची पत्नी आकांक्षा, आई मंगल दत्तात्रेय खोमणे यांचा जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने नागरी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घोडगंगाचे संचालक दादा पाटील फराटे, माजी सरपंच शिवाजी कदम, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष अमोल जगताप, हनुमंत खोमणे, सहजपूरचे सरपंच राजेंद्र माकर, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, गणेश गावडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावातील नागरी सत्काराला उत्तर देताना केशव खोमणे म्हणाले, ‘‘तब्बल १७ वर्ष गावापासून देऊ राहून भारतीय लष्कराच्या माध्यमातून देशाची सेवा केली. आता सेवानिवृत्तीनंतर माझ्या गावात माझा झालेला नागरी सत्कार पुढील उर्वरित आयुष्याला ऊर्जा देणार ठरेल, असा आशावाद व्यक्त केला.
सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे, माजी सैनिक संघटनेचे भाऊसाहेब जाधव, ज्ञानेश्वर फराटे, लक्ष्मण फराटे, किशोर फराटे, सुभाष गायकवाड, सुधीर फराटे, भाऊसाहेब शिंदे, बाबा पाटील फराटे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब फराटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
दरम्यान शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके, माजी आमदार अशोक पवार, जय मल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.