पुणे

वाकलेल्या खांबामुळे अपघातास निमंत्रण

CD

मांडवगण फराटा, ता. १ : आंधळगाव-तांदळी रस्त्यावर मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील चिंचेचा मळा येथे रस्त्याच्या लगत असलेले तीन वाकलेले विद्युत खांब अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. या खांबाच्या दुरुस्तीकडे महावितरणसह सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांकडून नागरिकांनी केला आहे.
मांडवगण फराटा परिसरात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. मांडवगण-तांदळी रस्त्याच्या बाजूला चारी नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. स्थानिक शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या बाजूला चारी खोदण्याबाबत मागणी केली होती. याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने जेसीबीच्या साहाय्याने चर खोदल्या. चर खोदल्याने माती ढिसाळ होऊन विद्युत खांब वाकले आहेत. या रस्त्याच्या बाजूने मोठ्या प्रमाणात खांब गेले असून एक विद्युत खांब थेट एका शेतकऱ्याच्या घराच्या भिंतीवर कोसळला आहे. सुदैवाने घराची भिंत न तुटल्याने जीवितहानी झाली नाही, तसेच एक खांब हा आंधळगाव-तांदळी रस्त्यावर वाकला आहे. वादळी वारा सुटल्यास हे वाकलेले खांब रस्त्यावर कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वाकलेल्या खांबाबाबत माहिती देऊनही महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग दुरुस्तीबाबत एकमेकांकडे बोट दाखवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आंधळगाव-तांदळी या रस्त्याने प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. या रस्त्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून वाकलेल्या खांबाबाबत महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे हे विद्युत खांबाचे नुकतेच काम पूर्ण झाले असून ते मुख्य रस्त्यालगत टाकले आहेत. त्यावरील विद्युत पुरवठा अजून सुरू केलेला नाही. या वाकलेल्या खांबाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. दरम्यान, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

मांडवगण फराटा-तांदळी रस्त्याच्या बाजूला गेल्या पाच दिवसांपासून विद्युत खांब रस्त्यावर वाकला आहे. या धोकादायक खांबामुळे जीवितहानी झाल्यास संबंधित विभाग त्याला सर्वस्वी जबाबदार असतील.
-संपत फराटे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शेअर बाजारात नुकसान होतंय? सुरक्षित परताव्यासाठी 'या' 6 योजनांमध्ये करा गुंतवणूक

ऑस्ट्रेलियाला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटरचं निधन, निवृत्तीनंतर १० वर्षांनी केलेलं पुनरागमन

Latest Maharashtra News Updates : दादर परिसरात जन्माष्टमी उत्सवादरम्यान महिलांनी दहीहंडी फोडली

CM Nitish Kumar : '5 वर्षात एक कोटी तरुणांना देणार सरकारी नोकऱ्या'; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मोठी घोषणा

iPhone 16 Pro Discount : आयफोन प्रेमींसाठी खुशखबर! iPhone 16 Pro मिळतोय 1 लाखाच्या आत, 'इतक्या' हजारांचा बंपर डिस्काउंट

SCROLL FOR NEXT