मांडवगण फराटा, ता. ३ : शिरूर तालुक्यातील एक अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीचा जवळचा नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलगी एका माध्यमिक शाळेत शिक्षण घेत आहे. तिच्या पोटात वारंवार दुखत असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी बारामती येथील महिला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांना शंका आल्याने डॉक्टरांनी तपासणी केली. यावेळी मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक बाब समोर आली. दरम्यान डॉक्टरांनी याबाबतची माहिती शिरूर पोलिसांना दिल्याने महिला पोलिस व युवतीच्या कुटुंबीयांनी युवतीकडे विचारपूस केली. युवतीने घडलेला प्रकार सांगितला. तिच्या जवळच्या नातेवाईक अल्पवयीन मुलाशी तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्याने सज्ञान झाल्यानंतर लग्नाचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांच्यात सहमतीने शारीरिक संबंध निर्माण झाले. यातून ती गर्भवती राहिली. मुलगी अल्पवयीन असताना हा प्रकार समोर आल्याने डॉक्टर यांची तक्रार व याबाबत पीडित युवतीच्या जबाबानुसार पोलिसांनी संबंधित अल्पवयीन युवकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार व बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.